रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणं अजबच !
Ricky PontingDainik Gomantak

रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होणं अजबच !

भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) रुपाने नवा प्रशिक्षक मिळाला आहे.

भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) रुपाने नवा प्रशिक्षक मिळाला आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यानंतर न्यूझीलंड मालिकेतून द्रविडने ही जबाबदारी स्वीकारली आहे. द्रविडने आपल्या प्रशिक्षक कारकिर्दीला वरिष्ठ संघासोबत विजयासह सुरुवात केली. बुधवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. द्रविड संघात सामील झाल्यामुळे बहुतेक लोक आनंदी आहेत, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) द्रविडने पद स्वीकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. द्रविडने याआधी प्रशिक्षक होण्यास नकार दिला होता, परंतु नंतर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या सांगण्यावरुन त्याने हे पद स्वीकारले.

द ग्रेड पॉडकास्टशी बोलताना पॉन्टिंग म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर द्रविडने ही जबाबदारी उचलली याचे मला आश्चर्य वाटते. अंडर-19 च्या भूमिकेत तो खूप खूश असल्याची चर्चा होती. मला त्याच्या कुटुंबाबद्दल माहित नाही पण मला माहित आहे की, त्याला मुले आहेत. त्यामुळेच त्यांनी ही जबाबदारी घेतली याचे मला आश्चर्य वाटते.”

Ricky Ponting
पाकिस्तानी संघाला सरावाच्या वेळी राष्ट्रध्वज फडकावनं पडलं चांगलंच महाग

पाँटिंगलाही ऑफर मिळाली

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनीही त्यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर मिळाल्याचे म्हटले आहे. त्याने पुढे सांगितले की, हा प्रस्ताव आपल्या समोर आयपीएल-2021 दरम्यान आला होता. माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितले की, जे लोक माझ्याकडे ही ऑफर घेऊन आले होते ते मला प्रशिक्षक बनवण्यासाठी खूप कटिबद्ध होते परंतु कामाच्या ताणामुळे त्याने ही ऑफर स्वीकारली नाही.

तो म्हणाला, “आयपीएल (IPL) दरम्यान मी काही लोकांशी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबद्दल बोललो. ज्या लोकांशी मी बोललो ते मला प्रशिक्षक बनायचे होते. पहिली गोष्ट मी म्हणाली की मी इतका वेळ देऊ शकत नाही. याचा अर्थ मला आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करता येणार नाही. तसेच, मला चॅनल 7 मधील काम सोडावे लागेल."

दिल्ली कॅपिटल्ससह यशस्वी कार्यकाळ

पाँटिंग हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक असून त्याच्या आगमनानंतर संघाने नवीन उंची गाठली आहे. त्याचे प्रशिक्षक होताच, संघाने 2019 मध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला. 2020 मध्ये, संघ प्रथमच आयपीएल फायनल खेळला परंतु मुंबई इंडियन्सकडून विजेतेपदाचा सामना गमावला. 2021 मध्ये तो संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात यशस्वी ठरला. दिल्ली कॅपिटल्सपूर्वी पॉन्टिंगने मुंबई इंडियन्ससोबतही काम केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com