Rishabh Pant: अपघातानंतर पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'जय शाह...'

अपघातानंतर पंतने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak

Rishabh Pant Reaction: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा २०२२ वर्षाच्या अखेरीस कार अपघात झाला होता. त्यानंतर त्याच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान, या अपघातानंतर पंतने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पंतने ट्वीट करताना बीसीसीआय, बीसीसीआय सचिव जय शाह आणि चाहत्यांचे आभार मानले आहे.

त्याने ट्वीट केले आहे की 'तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी मी कृतज्ञ आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. आता यातून सावरण्याचा कालावधी सुरू झाला आहे. मी पुढील आव्हानांसाठी सज्ज आहे. बीसीसीआय, जय शाह आणि सरकारी अधिकाऱ्यांना अविश्वसनीय पाठिंब्याबद्दल धन्यवाद.'

Rishabh Pant
Rishabh Pant: आयपीएल 2023 मध्ये पंत खेळणार की नाही? गांगुलीने दिली महत्त्वाची माहिती

पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दिल्लीवरून रुडकीला जात असताना अपघात झाला. त्याची कार नारसन बॉर्डरजवळ एका डिव्हायडरला धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर सुदैवाने पंत कारमधून बाहेर येण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. कारण या अपघातानंतर त्याच्या कारने पेट घेतला होता. त्यात त्याची कार पूर्णपणे जळाली.

या अपघातादरम्यान त्याला त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने मदत केली. त्याला लगेचच तेथील स्थानिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे त्याच्यावर काहीदिवस उपचार केल्यानंतर त्याला मुंबईला पुढील उपचारांसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी हलवण्यात आले.

(Rishabh Pant first reaction after car accident)

Rishabh Pant
Rishabh Pant Knee Surgery: ऋषभ पंतच्या प्रकृतीसंबंधी मोठी अपडेट, शस्त्रक्रिया यशस्वी

पंतला या अपघातादरम्यान डोक्याला, पाठिला, हाताच्या मनगटाला, घोट्याला दुखापती झाल्या आहेत. तसेच त्याच्या गुडघ्यात लिगामेंट टिअर्स झाले होते. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.

दरम्यान, त्याची प्रकृती आता स्थिर असली, तरी आता या दुखपतींमुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. असेही म्हटले जात आहे की तो 2023 वर्षातील सर्वच क्रिकेट सामन्यांना मुकू शकतो.

दरम्यान, पंतवर सध्या मुंबईत बीसीसीआयची वैद्यकीय टीमही लक्ष ठेवून आहे. तसेच बीसीसीआने त्याला या दुखापतींमधून पूर्ण बाहेर येईपर्यंत पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com