ICC च्या कसोटी क्रमवारीत ऋषभ पंतने रचला इतिहास

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांच्या यादीत सहावा क्रमांक मिळवला आहे.

आयसीसीने (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) इतिहास रचला आहे. पंतने शानदार कामगिरी करत जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांच्या यादीत सहावा क्रमांक मिळवला आहे. भारतासाठी अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत हा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (Ms Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) या भारताच्या माजी यष्टीरक्षक फलंदाजानांही अशी कामगिरी करता आली नाही.(Rishabh Pant made history in the ICC Test rankings)

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजांने पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीमध्ये स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या खात्यामध्ये आता 747 कसोटी गुण जमा झाले आहेत. ऋषभ पंतसोबत न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सन (Henry Nicholson) आणि भारताचा सलामीवर आक्रमक फलंदाज रोहीत शर्मा(Rohit Sharma) संयुक्तपणे सहाव्या क्रमाकांवर आहेत. तर टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली (Virat Kohli) पाचव्या स्थानावर आहेत.

IPL 2021: ''हे '' 5 विक्रम यंदाच्या आयपीएल हंगामात मोडू...

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या या क्रमवारीमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने (Dimuth Karunartne) 11 वे स्थान पटकावलं आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Ken Willamson) 919 गुणांसह प्रथम स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघातील खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य राहणे (Ajinkya Rahane) अनुक्रमे 14 व्या आणि 15 व्या स्थानावर आहेत. जगातील अव्वल एकदिवसीय फलंदाज आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम  नवव्या स्थानावर घसरला आहे.

संबंधित बातम्या