पंत चुकांमधून कधी शिकणार? IPLमध्ये कुलदीप यादव आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चहल शिकार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 211 धावा करूनही टीम इंडियाला 7 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले.
 Rishabh Pant
Rishabh Pant Twitter

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात 211 धावा करूनही टीम इंडियाला 7 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेनच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर या सामन्यात 19.1 षटकांत लक्ष्य गाठले गेले. या सामन्यात ऋषभ पंतची (Rishabh Pant) नेतृत्व क्षमता साधारण दिसली. दिल्ली कॅपिटल्सचा (DC) कर्णधार म्हणून त्याने आयपीएल 2022 मध्ये केलेल्या चुका त्याने पुन्हा एकदा केल्या आहेत. (India vs South Africa 1st T20)

 Rishabh Pant
PAK vs WI: बाबर आझमने रचला इतिहास, मोडीत काढला विराट कोहलीचा विक्रम

आयपीएल 2022 मध्ये दिल्लीसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कुलदीप यादव होता. पंतला त्याच्या कोट्यातील पूर्ण षटकेच मिळाली नसल्याचे अनेकदा दिसून आले. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 मध्येही त्याने असेच केले होते. युझवेंद्र चहलची फक्त दोन षटके झाली. मग शेवटच्या षटकात गोलंदाजी केली, तेव्हा संघाला चांगलेच धुतले. अक्षर पटेलने टाकलेली चार षटकाचा फटकाही संघाला सहन करावा लागला. चहलने पहिल्या दोन षटकांत 22 धावा दिल्या, मात्र अक्षरनेही 4 षटकांत 40 धावा दिल्या.

 Rishabh Pant
IND vs SA T20: ऋषभ पंतने धोनीला मागे टाकत नावावर केला खास विक्रम

IPL 2022 मध्ये चहलने राजस्थान रॉयल्ससाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने पर्पल कॅपही आपल्या नावावर केली. अशा परिस्थितीत तो संघाचा मुख्य गोलंदाज होता. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननेही युजीचा स्पेल पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. 43 वर्षीय माजी वेगवान गोलंदाजाचा असा विश्वास आहे की टीम इंडियाचा स्टँड-इन कर्णधार पंतने चहलला चार षटकांचा कोटा पूर्ण करू न देऊन चूक केली. तो म्हणाला की, लेग-स्पिनर पहिल्या काही षटकांमध्ये माफक दिसत असला तरी तो सामना भारताच्या बाजूने झुकवू शकला असता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com