INDvsENG : सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतच्या नावावर झाला अनोखा विक्रम 

INDvsENG : सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतच्या नावावर झाला अनोखा विक्रम 
Copy of Gomantak Banner - 2021-02-14T203453.940.jpg

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत मालिका आपल्या खिशात घातली होती. त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर याच मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु असून या सामन्याचा दुसरा दिवस संपला तेंव्हा टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केल्याचे चित्र आहे. आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याप्रमाणे इंग्लंड सोबतच्या सामन्यांमध्ये देखील भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकिपर फलंदाज रिषभ पंत धमाकेदार खेळीमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कांगारूंविरुद्ध चांगला खेळ केलेल्या रिषभ पंतने इंग्लंड सोबतच्या सामन्यांमध्ये देखील आपली फलंदाजी सातत्यपूर्ण ठेवली आहे. 

रिषभ पंतने इंग्लंड सोबत सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना, 77 चेंडूंचा सामना करत 58 धावा केलेल्या आहेत. यावेळी रिषभ पंतने तीन उत्तुंग षटकार आणि सात चौकार खेचले. रिषभ पंतने ही कामगिरी करताना लगावलेल्या षटकारांमुळे त्याच्या नावावर आता अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. रिषभ पंत हा 23 वर्षांचा आहे. आणि या वयात क्रिकेटच्या कसोटी प्रकारात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रिषभ पंतच्या नावावर झाला आहे. यापूर्वी टिम साऊथीने कसोटीत सर्वात अधिक षटकार मारले होते. मात्र इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात रिषभ पंतने तीन षटकार खेचताच हा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. 

रिषभ पंतने 23 व्या वर्षी इंग्लंड सोबतच सामना खेळताना कसोटी कारकिर्दीतील 31 वा षटकार खेचला. आणि यासोबतच त्याने 30 षटकार मारलेल्या टीम साऊथीला मागे टाकले. टीम साऊथीने वयाच्या 23 व्या वर्षी कसोटीत 30 षटकार लागवलेले आहेत. तर वयाच्या 23 व्या वर्षी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कसोटीमध्ये 29 षटकार ठोकलेले आहेत. 

23 व्या वर्षी कसोटीत सर्वात जास्त षटकार खेचणारे तीन फलंदाज - 

रिषभ पंत - 31

टीम साऊथी - 30

कपिल देव - 29

याव्यतिरिक्त, रिषभ पंतच्या नावावर अजून एक रेकॉर्ड जमा झाला आहे. कसोटीच्या 30 डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रिषभ पंत तिसऱ्या नंबरवर पोहचला आहे. रिषभ पंतने 18 कसोटी सामन्यांच्या 30 डावात फलंदाजी करताना, 1248 धावा केलेल्या आहेत. आणि त्यामुळे तो 30 डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यंदाची तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा ऍडम गिलख्रिस्ट याबाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 30 डावात सगळ्यात जास्त 1278 धावा केलेल्या आहेत. 

कसोटीच्या 30 डावात सर्वाधिक धावा करणारे तीन फलंदाज - 

ऍडम गिलख्रिस्ट - 1278

ड्यूजॉन - 1267 
         
रिषभ पंत - 1248

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com