Goa: ऋतूज, सेल्विनचे टेबल टेनिस प्रशिक्षणात यश

ऋतूज गोव्याचा माजी राज्यस्तरीय ज्युनियर विजेता आहे. तो राज्यातील प्रमुख टेबल टेनिसपटू आहे.
Goa: ऋतूज, सेल्विनचे टेबल टेनिस प्रशिक्षणात यश
Rituja, Selvin's success in table tennis trainingDainik Gomantak

पणजी: गोव्याचे टेबल टेनिसपटू ऋतूज सोनावणे व सेल्विन गुदिन्हो यांनी टेबल टेनिस प्रशिक्षणात यश प्राप्त केले आहे. दोघेही प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमात अ श्रेणीत उत्तीर्ण झाले.

पतियाळा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (SAI) राष्ट्रीय क्रीडा संस्थेचा (NIS) सहा आठवड्यांच्या टेबल टेनिस प्रशिक्षण प्रमाणापत्र अभ्यासक्रम घेण्यात आला होता. ऋतूज व सेल्विन यांनी भुवनेश्वर येथे अभ्यासक्रम पूर्ण केला. या ठिकाणच्या तुकडीत ऋतूजने अव्वल कामगिरी करताना 75.3 टक्के गुण प्राप्त केले, तर सेल्विनला 71.6 टक्के गुण मिळाले

Rituja, Selvin's success in table tennis training
WWE SummerSlam मध्ये सर्वाधिक सामने लढणारे 4 सुपरस्टार

ऋतूज गोव्याचा माजी राज्यस्तरीय ज्युनियर विजेता आहे. तो राज्यातील प्रमुख टेबल टेनिसपटू आहे. सेल्विनही माजी राज्यस्तरीय टेबल टेनिसपटू असून त्याने विविध राष्ट्रीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तो पणजी येथील डॉन बॉस्को ओरेटरी केंद्रात प्रशिक्षक आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com