गोवा राज्य बुद्धिबळ लीग स्पर्धेत ऋत्विज परबला विजेतेपद

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

डिचोलीच्या स्पर्धेत मंदारला उपविजेतेपद, नीतिशला तिसरा क्रमांक

पणजी: डिचोला तालुका बुद्धिबळ संघटनेने डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने घेतलेल्या तिसऱ्या अखिल गोवा राज्य बुद्धिबळ लीग स्पर्धेत ऋत्विज परब याने विजेतेपद पटकाविले. स्पर्धा ऑनलाईन माध्यमाद्वारे खेळली गेली.

मंदार लाड याला उपविजेतेपद, तर नीतिश बेलुरकर याला तिसरा क्रमांक मिळाला. ऋत्विज व मंदार यांचे समान साडेसात गुण झाले. टायब्रेकर गुणांत ऋत्विज अव्वल ठरला. नीतिशने सात गुणांची नोंद केली.

पार्थ साळवी, तन्वी हडकोणकर, साईराज वेर्णेकर, अनिरुद्ध भट, जॉय काकोडकर, आकाश शेटगावकर, श्रीलक्ष्मी कामत, विल्सन क्रूझ, शेखर सिरसाट, स्वेरा ब्रागांझा, सुयन बेलुरकर, एथन वाझ यांना अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक मिळाला. सयुरी नाईक, सारस पोवार, दिया सावळ, अवनीश बोरकर, वैष्णव परब, महादेव सावंत, आर्या दुबळे, रुबेन कुलासो, नेत्रा सावईकर, चैतन्य गावकर, श्लोक धुळापकर यांना अन्य गटात बक्षीस मिळाले. डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव सत्यवान हरमलकर स्पर्धेच संचालक, तर अरविंद म्हामल मुख्य आर्बिटर होते.

संबंधित बातम्या