Team India: टीम इंडियाचा 'हा' धाकड निवृत्तीनंतर मैदानात परतला, भारतासाठी विश्वचषक...!

International League T20 Dubai: टीम इंडियाच्या एका विस्फोटक फलंदाजाने यापूर्वी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
Robin Uthappa
Robin UthappaDainik Gomantak

International League T20 Dubai: टीम इंडियाच्या एका विस्फोटक फलंदाजाने यापूर्वी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर काही महिन्यांनीच हा खेळाडू मैदानात परतला आहे. हा खेळाडू टी-20 लीगमध्ये खेळत असला तरी. या खेळाडूने मैदानावर दमदार पुनरागमन करताना झंझावाती खेळी केली, ज्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

रॉबिन उथप्पाने दुबई कॅपिटल्सकडून खेळताना विस्फोटक खेळी केली

टीम इंडियाकडून खेळलेल्या रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) 14 सप्टेंबर 2022 रोजीच क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. तो सध्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय लीग T20 (ILT20 2023) मध्ये खेळत आहे. रॉबिन उथप्पाने या लीगमध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळताना विस्फोटक खेळी केली आहे.

Robin Uthappa
Team India ची न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया मालिकांसाठी घोषणा, ईशान-सूर्याला कसोटीत संधी, तर रोहित-विराट...

171 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या

गल्फ जायंट्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रॉबिन उथप्पाने सलामी करताना शानदार खेळी केली. त्याने 46 चेंडूंचा सामना केला आणि 171 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या. यादरम्यान रॉबिन उथप्पाच्या बॅटमधून 10 चौकार आणि 2 षटकार आले. रॉबिन उथप्पा व्यतिरिक्त युसूफ पठाण देखील या संघाचा एक भाग आहे.

Robin Uthappa
Team India: T20 संघात रोहित अन् विराटची निवड होणार नाही, रिपोर्टमधून आले समोर

2006 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले

रॉबिन उथप्पाने 2006 साली टीम इंडियात (Team India) पदार्पण केले. रॉबिन उथप्पाने मधल्या फळीपासून ते टॉप ऑर्डरपर्यंत जवळपास प्रत्येक क्रमाने फलंदाजी केली. 2007 च्या T20 विश्वचषकातही तो सहभागी झाला होता.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदा टी-20 चॅम्पियन बनली तेव्हा त्या विजयाच्या नायकांमध्ये उथप्पाचे नावही सामील झाले होते. रॉबिन उथप्पाने टीम इंडियासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात 25.94 च्या सरासरीने 934 धावा केल्या, तर टी-20 मध्ये त्याने 24.9 च्या सरासरीने 249 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com