
Rohan Bopanna with Matthew Ebden Reached US Open Grand Slam men doubles final: अमेरिकन ओपन 2023 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्नाने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. बोपन्ना मॅथ्यू एबडेनच्या साथीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहचला आहे.
त्यामुळे तो गुरुवारी ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहचणारा ओपन एरामधील सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. त्याने 43 वर्षे 6 महिने वय असताना ही कामगिरी केली. याशिवाय तो १३ वर्षांनंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत अंतिम फेरीत पोहचला आहे.
यापूर्वी तो २०१० साली अमेरिकन ओपनचाच अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी तो पाकिस्तानच्या ऐसम-उल-हक-कुरेशी याच्यासह खेळला होता.
गुरुवारी बोपन्ना आणि एडबेन या जोडीने पिएर-ह्युजेस हर्बर्ट आणि नोकलस माहुत या जोडीला लुईस आर्मस्ट्राँग स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीत 7-6 (7-3), 6-2 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला.
या उपांत्य सामन्यात पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला बोपन्ना आणि एबडेन यांची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. ते 4-2 असे पिछाडीवर होते.
पण नंतर त्यांनी पुनरागमन केले. हा सेट टायब्रेकरमध्ये गेला होता. टायब्रेकर बोपन्ना आणि एबडेन यांनी 7-3 असा सहज जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये बोपन्ना आणि एबडेन यांनी सहज विजय मिळवला.
बोपन्ना आणि एबडेन यांना आता शुक्रवारी ग्रँडस्लॅम विजयाची संधी असणार आहे. त्यांना अंतिम फेरीत राजीव राम आणि जो सॅलिसबरी या जोडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, बोपन्नाला दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी असणार आहे.
यापूर्वी बोपन्नाने 2017 साली झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीमध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोवस्कीबरोबर खेळताना विजेतेपद जिंकले होते.
बोपन्ना यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने याचवर्षी सुरुवातीला सानिया मिर्झाबरोबर खेळताना ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत अंतिम सामना खेळला होता. तसेच तो विम्बल्डन 2023 मध्येही तो पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.