INDvsENG : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला दुहेरी फटका 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 24 मार्च 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करून पाहुण्या इंग्लंडच्या संघावर आघाडी मिळवली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करून पाहुण्या इंग्लंडच्या संघावर आघाडी मिळवली आहे. मात्र आगामी दुसऱ्या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला दुहेरी झटका बसला आहे. कारण पहिल्या सामन्यात कोपर दुखापतीमुळे हिटमॅन रोहित शर्मा दुसर्‍या सामन्यात खेळू शकणार नाही. तर पहिल्या सामन्यात झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेमधून बाहेर पडला आहे. श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असल्याचे बोलले जात असून त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या पहिल्या भागातही तो खेळू शकणार नसल्याचे समजते. (Rohit Sharma and Shreyas Iyer out due to injuries before the second ODI against England)

ICC T20 RANKING: के. एल. राहुलची घसरण; तर विराटची झेप

पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्माला (Rohit Sharma) इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडचा चेंडू कोपऱ्याला लागला होता. मार्क वुडचा चेंडू ताशी 148 किलोमीटर होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरू शकणार नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी श्रेयस अय्यरबद्दल बीसीसीआयने स्पष्ट करताना श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंड संघाविरुद्धच्या आगामी दोन उर्वरित सामन्यांमध्ये मैदानात उतरणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे प्लेयिंग इलेव्हन मध्ये नसल्यामुळे भारतीय संघाला दुहेरी फटका बसला आहे. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी व टी-ट्वेन्टी मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. आणि टीम इंडियाने सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल व कृणाल पांड्या यांच्या खेळीच्या जोरावर 318 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघाला दिले होते. तर इंग्लंडचा संघ 42.1 षटकांमध्ये सर्व बाद होत 251 धावांपर्यंतच पोहचू शकला होता. भारताकडून सर्वाधिक बळी प्रसिद्ध कृष्णाने टिपले. त्याने चार विकेट्स घेतल्या. याशिवाय शार्दूल ठाकूरने तीन, भुवनेश्वर कुमारने दोन व कृणाल पांड्याने एक विकेट मिळवली.         

  

संबंधित बातम्या