Rohit Sharma बनला 'T20 किंग', अवघ्या दोन दिवसांत मोडला मार्टिन गुप्टिलचा विश्वविक्रम

Rohit Sharma Record: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak

IND vs WI 1st T20: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला मागे टाकून त्याने हा विक्रम केला आहे. मार्टिन गप्टिलने दोनच दिवसांपूर्वी स्कॉटलंडविरुद्ध 40 धावा करत रोहित शर्माला मागे टाकले होते, मात्र आता पुन्हा एकदा रोहित शर्मा टी-20 किंग बनला आहे.

दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) पहिल्या T20 सामन्यात हा विक्रम केला. ब्रायन लारा स्टेडियम, तारौबा येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार निक्लोस पूरन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Rohit Sharma
Rohit Sharma: कोणीच योग्य प्रश्न का विचारत नाही?

दुसरीकडे, रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात 21 धावा करताच T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले. यासह या फॉरमॅटमध्ये 3400 धावांचा टप्पा पार करणारा रोहीत पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात रोहितने अर्धशतक झळकावले असून तो अजूनही फलंदाजी करत आहे.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

  • रोहित शर्मा- 3432

  • मार्टिन गप्टिल- 3399

  • विराट कोहली- 3308

  • पॉल स्टर्लिंग- 2894

  • एरॉन फिंच- 2855

Rohit Sharma
Rohit Sharmaचे उपकर्णधारपद विराटला काढून घ्यायचे होते

भारत आणि वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (क), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग

शामराह ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, निकोलस पूरन (सी आणि डब्ल्यूके), काइल मेयर्स, जेसन होल्डर, अकील होसेन, ओडियन स्मिथ, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com