IND vs SL, 3rd ODI: विजय अन् फक्त एक धाव... हिटमॅन होईल विराट-सचिनच्या पंक्तीत सामील

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत रोहित शर्मा मोठा विक्रम करू शकतो.
IND vs SL, 3rd ODI: विजय अन् फक्त एक धाव... हिटमॅन होईल विराट-सचिनच्या पंक्तीत सामील

India vs Sri Lanka, 3rd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी तिरुअनंतपुरममध्ये होणार आहे. ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा एका विक्रमाला गवसणी घालू शकतो.

या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आणि रोहितने एकजरी धाव केली, तर तो विजयी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 12 हजार धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी असा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांनाच करता आला आहे.

विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने विजय मिळवलेल्या 288 सामन्यांचा आत्तापर्यंत भाग झाला आहे. यामध्ये त्याने 16119 धावा केल्या आहेत. तसेच सचिन तेंडुलकर भारताने विजय मिळवलेल्या 307 सामन्यांचा भाग होता. यामध्ये सचिनने 17113 धावा केल्या आहेत.

तसेच रोहितच्या नावावर सध्या 270 विजयी सामन्यांमध्ये 11999 धावा आहेत. त्यामुळे 12 हजारांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला एकाच धावेची गरज आहे.

(Rohit Sharma can join Sachin Tendulkar and Virat Kohli in elusive list)

IND vs SL, 3rd ODI: विजय अन् फक्त एक धाव... हिटमॅन होईल विराट-सचिनच्या पंक्तीत सामील
India vs Sri Lanka: हार्दिकने गमावला संयम, टीममेट्सविरुद्धच वापरले अपशब्द; Video व्हायरल

जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये विजयी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. त्याने विजयी सामन्यांमध्ये 20140 धावा केल्या आहेत. या यादीत सचिन दुसऱ्या आणि विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर रोहित 12 व्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माची वर्षाची सुरुवात चांगली

रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत 83 धावांची खेळी करत वर्षाची चांगली सुरुवात केली होती. तसेच दुसऱ्या सामन्यात मात्र तो 17 धावांवर बाद झाला. पण असे असले तरी त्याने या दोन्ही सामन्यात केलेल्या सकारात्मक फलंदाजीवरून तो चांगल्या लयीत असल्याचे म्हटले जात आहे.

IND vs SL, 3rd ODI: विजय अन् फक्त एक धाव... हिटमॅन होईल विराट-सचिनच्या पंक्तीत सामील
Rohit Sharma: रोहित पुन्हा भावूक! 'या' फॅमिली मेंबरसाठी केलं अर्धशतक समर्पित?

रोहित गेल्या महिन्यात बांगलादेश दौऱ्यात दुसरा वनडे सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला होता. त्यामुळे तो बांगलादेशविरुद्ध तिसरा वनडे आणि कसोटी मालिकाही खेळू शकला नव्हता. त्याचबरोबर तो श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतही खेळला नव्हता.

पण या दुखापतीनंतर त्याने आता श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी20 मालिका खेळायची आहे. पण रोहित वनडे संघात कायम असला, तरी टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द संपल्याची चर्चा होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com