Rohit Sharma: अन् हिटमॅनला पाहून छोट्या चाहत्याला कोसळले रडू, मग काय झाले पाहा Video

रोहित शर्माला पाहून गुवाहाटीमध्ये लहान मुलगा अचानक रडायला लागला होता.
Rohit Sharma cheers up his crying fan
Rohit Sharma cheers up his crying fanDainik Gomantak

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट संघांमध्ये मंगळवारी वनडे मालिकेतील पहिला सामना होणार आहे. गुवाहाटी येथे होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज असून चाहतेही उत्सुक आहेत. दरम्यान एक छोटा चाहता भारतीय क्रिकेट कर्णधार रोहित शर्माला पाहून रडत असतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेटपटूंची लोकप्रियता जगभरात दिसून येते. त्यांची एक झलक टिपण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अनेकदा आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून चाहते भारावून जातात. काहीशी अशीच घटना गुवाहाटीमध्ये पाहायला मिळाली.

(Rohit Sharma cheers up his young crying fan)

Rohit Sharma cheers up his crying fan
Rohit Sharma: हिटमॅनचा वनडेतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडणार 'हा' खेळाडू, श्रीलंकेविरुद्ध...

झाले असे की पहिल्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करत होते. त्यावेळी स्टेडियममध्ये काही चाहतेही उपस्थित होते. दरम्यान, जेव्हा खेळाडूंचा सराव संपल्यानंतर ते बसकडे जात होते, त्यावेळी स्टँडजवळील चाहत्यांच्या गर्दीकडे रोहित गेला. तेव्हा त्याला पाहून एक लहान मुलगा रडायला लागला.

त्याला रडताना पाहून रोहितने त्याची विचारपूस केली. त्या लहान मुलाने रोहित त्याचा आवडता खेळाडू असल्याचे सांगितले. नंतर रोहितने त्याची समजूत घातली. या घटनेच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Rohit Sharma cheers up his crying fan
Rohit Sharma: 'तो पुरेसा तंदुरुस्त आहे का?', रोहित शर्माच्या नेतृत्वावर कपिल देव यांचा सवाल

दरम्यान, रोहित श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करत आहे. त्याला गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका आणि श्रीलंकेविरुद्धची टी२० मालिका खेळल नव्हता.

आता यानंतर तो वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष राहाणार आहे. भारताला श्रीलंकेविरुद्ध १० जानेवारीनंतर १२ जानेवारीला कोलकाता येथे दुसरा वनडे सामना खेळायचा आहे. त्यानंतर १५ जानेवारीला तिरुअनंतपुरम येथे तिसरा वनडे सामना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com