दुखापतग्रस्त रोहितची चेन्नईविरुद्ध विश्रांती

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

तंदुरुस्त नसल्यामुळे रोहित या सामन्यात खेळणार नसल्याचे मुंबई इंडियन्सचा बदली कर्णधार किएरॉन पोलार्डने सांगितले. त्याच्याऐवजी सौरभ तिवारीची निवड करण्यात आली. रोहित लवकरच तंदुरुस्त होईल आणि पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल, असे पोलार्डने सांगितले.

दुबई-डाव्या पोटरीचा स्नायू दुखावल्यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली. सामन्याची नाणेफेक होण्यास काही मिनिटे असताना याबाबतची घोषणा करण्यात आली. 

तंदुरुस्त नसल्यामुळे रोहित या सामन्यात खेळणार नसल्याचे मुंबई इंडियन्सचा बदली कर्णधार किएरॉन पोलार्डने सांगितले. त्याच्याऐवजी सौरभ तिवारीची निवड करण्यात आली. रोहित लवकरच तंदुरुस्त होईल आणि पुन्हा कर्णधारपद स्वीकारेल, असे पोलार्डने सांगितले. त्याचवेळी त्याने रोहितऐवजी सोरभ हाच संघातील एकमेव बदल असल्याचे सांगितले.

पंजाबविरुद्धच्या लढतीच्यावेळी रोहितला दुखापत झाली. गेल्या चार दिवसांत त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे. त्याच्या तंदुरुस्तीवर संघव्यवस्थापनाचे लक्ष आहे. भारतीय क्रिकेट मंडळास त्याबाबतची माहिती देत आहोत, असे मुंबई इंडियन्सने संघव्यवस्थापनाने कळवले आहे.

संबंधित बातम्या