
Rohit Sharma forgot his passport video viral after India won Asia Cup 2023:
भारतीय संघाने रविवारी (17 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत करत आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. मात्र, या अंतिम सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात रोहित शर्माचा विसराळूपणा पाहायला मिळाला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर खेळाडू पुन्हा कोलंबोतून मुंबईला परत येत असतानाचा असल्याचे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की भारतीय खेळाडू बसमध्ये बसले आहेत.
यावेळी रोहित बसच्या दारापाशी उभा आहे. तो त्याच्या पासपोर्टची वाट पाहात आहे, जो तो हॉटेलमध्येच विसरून आला होता. त्यानंतर सपोर्ट स्टाफमधील सदस्य त्याला त्याचा पासपोर्ट आणून देतो.
यावेळी तो पासपोर्ट विसरल्याने बसमध्ये बसलेले खेळाडू त्याच्याबरोबर मस्ती करायची म्हणून टाळ्याही वाजवत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओपाहून पुन्हा एकदा रोहितच विसराळू स्वभाव पाहायला मिळाला आहे.
खरंतर रोहितबरोबर खेळलेल्या अनेक खेळाडूंनी तो विसराळू असल्याचे अनेकदा सांगितले आहे. तो बऱ्याचदा गोष्टी विसरत असतो. याचवर्षी जानेवारी महिन्यात तो नाणेफेक जिंकल्यानंतर कोणता निर्णय घ्यायचा हे देखील विसरला होता.
तसेच विराट कोहलीने एका जुन्या मुलाखतीत रोहितच्या विसराळूपणाबद्दल सांगितले होते. तो व्हिडिओ आता चर्चेत आला आहे. त्यात विराट म्हटला आहे की रोहित काहीपण विसरू शकतो.
रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताकडून मोहम्मद सिराजने घेतलेल्या 6 विकेट्समुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव 15.2 षटकातच 50 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने 51 धावांचे आव्हान अवघ्या 6.1 षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले.
या विजयामुळे भारताने दुसऱ्यांदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकावर नाव कोरले. यापूर्वी भारताने 2018 साली रोहितच्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकला होता. तसेच भारताने आता 1984, 1988, 1991, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 असे 8 वेळा आशिया चषकावर नाव कोरले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.