IND vs NZ: तिसऱ्या वनडेला टीम इंडियाचे 'हे' 2 धाकड मुकणार? कर्णधार रोहित स्पष्टचं बोलला

IND vs NZ 3rd ODI: आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs New Zealand, 3rd ODI Playing 11: भारतीय संघाने टी-20 नंतर न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिकाही जिंकली आहे. अनुभवी सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी कर्णधार रोहितने दोन सर्वोत्तम खेळाडूंना विश्रांती देण्याचे संकेत दिले आहेत.

रोहितने निदर्शनास आणून दिले

भारताला पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs AUS कसोटी) खेळायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीने भारतासाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका आहे.

कर्णधार रोहित शर्माने यासाठी तयारी केली आहे. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या वनडेत मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचे संकेत दिले आहेत.

Team India
IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी भारताची Playing 11 फिक्स! कर्णधार रोहित 'या' खेळाडूला देणार डच्चू?

सिराज आणि शमीला मिळणार विश्रांती!

रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, 'गेल्या पाच सामन्यांमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आमच्या खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. शमी आणि सिराज लांब स्पेल टाकण्यासाठी खूप उत्सुक होते पण मी त्यांना आठवण करुन दिली की एक कसोटी मालिका देखील येत आहे, त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.'

Team India
IND vs NZ: रोहित-विराट खेळणार नाहीत न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा वनडे सामना! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शमी आणि सिराजसह एकूण 12 षटके झाली

दुसऱ्या वनडेतही रोहितला या दोन गोलंदाजांकडून केवळ 12 षटके मिळाली. जिथे शमीने 6 षटकात 18 धावा देत 3 बळी घेतले. त्याचवेळी सिराजने तेवढीच षटके टाकल्यानंतर केवळ 10 धावा देत एक बळी घेतला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोन्ही गोलंदाजांना संधी द्यायची आहे, असे रोहितने सामन्यानंतर स्पष्ट केले. त्यामुळे इंदूर येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत उमरान मलिकला संधी दिली जाईल, असे मानले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com