कर्णधार म्हणून रोहित शर्मा 'हिट', मात्र फलंदाजीत 'फ्लॉप'

रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या तीन डावात 90 धावा केल्या.
कर्णधार म्हणून रोहित शर्मा 'हिट', मात्र फलंदाजीत 'फ्लॉप'
Rohit SharmaDainik Gomantak

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय नोंदवला. टीम इंडिया प्रथमच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका खेळत होती. रोहितला गेल्या वर्षाच्या अखेरीस टी-20 आणि नंतर वनडेचा कर्णधार बनवण्यात आले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याच्याकडे कसोटीचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. रोहित पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाने (Team India) एकही सामना गमावलेला नाही. मात्र यादरम्यान त्याची बॅट शांत राहिली. 2022 मध्ये त्याने विराट कोहलीपेक्षा कमी धावा केल्या आहेत.

Rohit Sharma
IPL 2022: आयपीएल च्या नियमात मोठा बदल; DRS ची वाढली संख्या

रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या तीन डावात 90 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 30.00 होती. भारताच्या चार फलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 201, श्रेयस अय्यरने 186, ऋषभ पंतने 185 आणि हनुमा विहारीने 124 धावा केल्या.

Rohit Sharma
Women’s World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची विजयी घौडदौड सुरुच, वेस्ट इंडिज चा उडावला धुव्वा

कोहली आणि रोहितची यंदाची कामगिरी कशी आहे?
2022 मध्ये कोहली रोहितच्या पुढे उभा आहे. हिटमॅनने तिन्ही फॉरमॅटमध्ये 11 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 12 डावात 23.66 च्या सरासरीने 284 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 60 आहे. रोहितने यंदा केवळ एकच अर्धशतक केले. त्याने एकही शतक केले नाही.

विराट कोहलीनेही (Virat Kohli) रोहितच्या बरोबरीने 11 सामने खेळले आहेत. मात्र, विराटच्या खात्यात एक डाव जास्त आहे. त्याने 13 डावात 30.76 च्या सरासरीने 400 धावा केल्या आहेत. कोहलीने रोहितपेक्षा एक डाव जास्त खेळून 116 धावा केल्या आहेत. विराटने चार अर्धशतके झळकावली आहेत, मात्र त्याला एकही शतक झळकावता आले नाही. त्याची सर्वोच्च धावसंख्या 79 आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com