हिट मॅनने रचला इतिहास, T20 World Cup मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाने सलग दुसरा विजय नोंदवला.
Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाने सलग दुसरा विजय नोंदवला. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 56 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात रोहितने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आता टी-20 वर्ल्ड कपमधील 35 मॅचमध्ये 34 सिक्स आहेत. हा आकडा गाठणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

तत्पूर्वी, हा विक्रम टीम इंडियाचा (Team India) माजी दिग्गज फलंदाज युवराज सिंगच्या नावावर होता. युवराजने टी-20 वर्ल्ड कपमध्ये 33 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, त्याने एका सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते. या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने T20 विश्वचषकात 23 सामने खेळताना 26 षटकार मारले आहेत. जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक, एमएस धोनीने टी-20 विश्वचषकातील 33 सामन्यांमध्ये 16 षटकार ठोकले आहेत.

Rohit Sharma
T20 World Cup: किंग कोहलीच्या नावावर 'विराट विक्रम'

शिवाय, टीम इंडियासाठी टी-20 मध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या सुरेश रैनाचाही (Suresh Raina) या यादीत समावेश आहे. सुरेश रैनाने T20 विश्वचषकातील 26 सामन्यांमध्ये 12 षटकार मारले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com