रोहित आयपीएलमध्ये खेळल्याने सौरव गागुंली नाराज

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

रोहित शर्माने भले मुंबई इंडियन्सच्या आयपीएल विजेतेपदात निर्णायक कामगिरी केली असेल; पण तो ७० टक्केच तंदुरुस्त असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले; तरीही तो आयपीएल का खेळला, हे त्यालाच विचारणे योग्य होईल, असेही अध्यक्षांनी सांगितले.

नवी दिल्ली :  रोहित शर्माने भले मुंबई इंडियन्सच्या आयपीएल विजेतेपदात निर्णायक कामगिरी केली असेल; पण तो ७० टक्केच तंदुरुस्त असल्याचे भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले; तरीही तो आयपीएल का खेळला, हे त्यालाच विचारणे योग्य होईल, असेही अध्यक्षांनी सांगितले.

रोहित अजूनही ७० टक्केच तंदुरुस्त आहे, असे गांगुलीनी सांगितले. तंदुरुस्त नसल्यामुळे रोहितला भारतीय संघाबाहेर ठेवण्यात आले; पण तरीही तो आयपीएल खेळला, याकडे लक्ष वेधल्यावर गांगुली संतापले. ते म्हणाले, तुम्ही याबाबत रोहितलाच का विचारत नाही. तो पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळेच त्याची ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय तसेच ट्‌वेंटी २० सामन्यांसाठी निवड झाली नाही. त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. 

आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्याच्या वेळी रोहितला दुखापत झाली. त्यामुळे तो आयपीएलमधील चार लढती खेळला नाही; मात्र अखेरच्या तीन लढती खेळला. त्याने दिल्लीविरुद्ध  अंतिम सामन्यात अर्धशतक केले. मंडळाने रोहितला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. त्यानंतर त्याची तंदुरुस्त चाचणी होईल. त्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियास अन्य खेळाडूंबाबत जाऊ शकला नाही. 

भारतीय खेळाडूंच्या दुखापतीचा बीसीसीआय सातत्याने आढावा घेते, असे गांगुली यांनी सांगितले. ते म्हणाले, खेळाडूंच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडे पूर्ण माहीती असणार. भारतीय संघाचे फिझिओ, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीस याची पूर्ण कल्पना असते. बीसीसीआयचे काम कसे होते, वृद्धिमान साहाच्या दुखापतीची संबंधितांना पूर्ण कल्पना आहे. चाहत्यांना दुखापतीचे नेमके स्वरूप, त्याची तीव्रताच कळत नाही, त्यामुळेच काहीही टिप्पणी होत असते. कसोटीपूर्वी वृद्धिमान तंदुरुस्त होईल, याची खात्री असल्यानेच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे.

"खेळाडूंच्या दुखापतीबाबत कोणाला माहिती असणार तर ते भारतीय मंडळास. भारतीय संघाचे फिझिओ तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीस याची पूर्ण कल्पना असते. आयपीएलच्या संपूर्ण कालावधीत भारतीय संघाचे फिझिओ तसेच ट्रेनर दुबईत होते. फिझिओ डॉ. नितीन पटेल हे खेळाडूंच्या दुखापतीचा सातत्याने आढावा घेत होते; तसेच त्याची तीव्रता वाढू नये, याकडे लक्ष देत होते. "

 - सौरव गांगुली.

संबंधित बातम्या