रोहित शर्मा 30 दिवसांनंतर फिटनेस टेस्ट उत्तीर्ण; ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका खेळणार? वाचा..

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा बंगळूरच्या राष्ट्रीय क्रीडा अकादमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाला आहे. 17 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ही चाचणी पूर्ण करणे त्याच्यासाठी बंधनकारक होते.

नवी दिल्ली- भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा बंगळूरच्या राष्ट्रीय क्रीडा अकादमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण झाला आहे. 17 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ही चाचणी पूर्ण करणे त्याच्यासाठी बंधनकारक होते. मात्र, कोविडमुळे ऑस्ट्रेलियातील क्वारंटाइन नियमांचे पालन करावे लागणार असल्याने पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश करता येणार नाही. त्यानंतर होणाऱ्या दोन सामन्यांसाठी मात्र तो उपस्थित असण्याची शक्यता आहे.

रोहितने फिटनेस टेस्ट पास केली असून लवकरच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे, असे बीसीसीआयच्या वरीष्ठ सुत्रांकडून सांगण्यात आले. एनसीएचे संचालक राहूल द्रविड यांच्या देखरेखीखाली त्याची ही तंदरूस्ती परीक्षा पार पडली. रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी फिटनेस प्रमाण पत्र देण्याची जबाबदारी द्रविड यांच्यावर होती.  

रोहित ऑस्ट्रेलियात रवाना झाल्यानंतर त्याला 14 दिवस अलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यानंतर 7 ते 11 जानेवारीदरम्यान सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी व 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या चौथ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.     

आयपीएल दरम्यान झालेल्या स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला काही सामन्यांमध्ये माघार घ्यावी लागली होती. यानंतर त्याच्या तंदरूस्तीवर प्रश्नचिन्ह असल्याने त्याचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेसाठी विचार करण्यात आला नव्हता. 

संबंधित बातम्या