‘बोला था आपको मामू, इनकी  गणित वीक है’

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

मुंबई आयपीएल केवळ विषम वर्षातच जिंकते, या समाज माध्यमांवरील टिपण्णीस रोहित शर्माने ‘बोला था आपको मामू इनकी गणित वीक है’ असे प्रत्युत्तर दिले.  मुंबई यापूर्वी आयपीएल २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या विषम वर्षात जिंकली होती.

मुंबई :   मुंबई आयपीएल केवळ विषम वर्षातच जिंकते, या समाज माध्यमांवरील टिपण्णीस रोहित शर्माने ‘बोला था आपको मामू इनकी गणित वीक है’ असे प्रत्युत्तर दिले.  मुंबई यापूर्वी आयपीएल २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ या विषम वर्षात जिंकली होती. त्यामुळे मुंबई यंदा जिंकणार नाहीत, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. त्यास रोहितने उत्तर दिले.   

योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा करीत आहे. आयपीएलमध्ये सम वर्षही जिंकता येते, या आपल्या यापूर्वीच्या ट्विटची आठवण रोहितने करून दिली. त्यासोबत आम्ही सम वर्षात जिंकलो. ‘बोला था आपको मामू, इनकी गणित वीक है’ असे ट्विट केले आहे. 

संबंधित बातम्या