IND vs PAK: रोहित-गिलची शतकी भागदारी ठरली विक्रमी! भारताची ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

Rohit Sharma - Shubman Gill: पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतके झळकावण्याबरोबर शतकी भागीदारीही केली.
Rohit Sharma - Shubman Gill
Rohit Sharma - Shubman GillDainik Gomantak

Rohit Sharma Shubman Gill century partnership:

रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेत सुपर फोरचा सामना होत आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीला दमदार खेळ करत शतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीला फलंदाजीला उतरले.

सुरुवातीला अनेकदा पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी त्यांना चकीत करत चकवले. मात्र, या दोघांनीही सयंम ठेवत धावफलक हलता ठेवताना काही आक्रमक शॉट्सही खेळले. दरम्यान, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोघांनीही आक्रमक फटके मारत अर्धशतके पूर्ण केली.

Rohit Sharma - Shubman Gill
पावसाचे सावट असलेल्या IND vs PAK सामन्याला राखीव दिवसाचा दिलासा, पण काय आहेत नियम?

मात्र, अर्धशतकानंतर शादाब खानने रोहितला फहिम अश्रफच्या हातून झेलबाद केले. रोहितने 49 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. तो बाद झाल्याने सलामीची 121 धावांची भागीदारी तुटली.

रोहित 17 व्या षटकात बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात शुभमन गिलला शाहिन आफ्रिदीने आघा सलमानच्या हातून झेलबाद केले. गिलने 10 चौकारांसह 52 चेंडूत 58 धावांची खेळी केली.

दरम्यान, रोहित आणि गिल यांच्यात झालेली भागीदारी ही भारताकडून पाकिस्तानविरुद्ध वनडेत सलामीला झालेली ही 13 वी शतकी भागीदारी ठरली. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध वनडेत सलामीला सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या संघांमध्ये भारताने अव्वल क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाची बरोबरी केली आहे.

Rohit Sharma - Shubman Gill
IND vs PAK: श्रेयस अय्यरने वाढवली टीम इंडियाची चिंता! पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचे खरे कारण आले समोर

ऑस्ट्रेलियाकडूनही पाकिस्तानविरुद्ध वनडेत सलामीला 13 वेळा शतकी भागीदारी करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारतापाठोपाठ इंग्लंड असून त्यांच्याकडून 11 वेळा पाकिस्तानविरुद्ध वनडेत सलामीला शतकी भागीदाऱ्या झाल्या आहेत.

  • वनडेत पाकिस्तानविरुद्ध सलामीला सर्वाधिक शतकी भागीदाऱ्या करणारे संघ -

  • 13 वेळा - ऑस्ट्रेलिया

  • 13 वेळा - भारत

  • 11 वेळा - इंग्लंड

  • 9 वेळा - वेस्ट इंडिज

  • 8 वेळा - दक्षिण आफ्रिका

दरम्यान, रोहित आणि गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल डाव सांभाळत होते. मात्र 25 वे षटक सुरू असताना पाऊस आल्याने काही वेळासाठी सामना थांबला. त्यावेळी भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com