Rohit Sharma Statement: टीम इंडियाच्या विजयानंतरही हिटमॅन नाराज, आपल्या वक्तव्याने...!

Rohit Sharma: भारतीय संघाने मंगळवारी गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला.
Rohit Sharma Statement:
Rohit Sharma Statement:Dainik Gomantak

Rohit Sharma: भारतीय संघाने मंगळवारी गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. यासह भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. स्टार फलंदाज विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय संपादन केला. या सामन्यात विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावा काढल्या, ज्यात 12 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे.

टीम इंडियाचा विजय आणि कोहलीच्या शतकानंतरही कर्णधार रोहित खूश नाही

टीम इंडियाचा (Team India) विजय आणि विराट कोहलीच्या धडाकेबाज शतकानंतरही भारतीय कर्णधार रोहित शर्मा आनंदी दिसत नव्हता. सामन्यानंतर कर्णधार रोहितने अचानक आपल्या एका वक्तव्याने सर्वांनाच चकित केले.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सामन्यानंतर एक धक्कादायक विधान केले असून, 'भारताच्या या विजयाने मी खूप प्रभावित झालो आहे. फलंदाजांनी चांगली सुरुवात केली आणि सामन्यात आपेक्षित धावसंख्या उभारली. या सामन्यात आमच्या फलंदाजांनी खरोखरच विजयाचा भक्कम पाया रचला, पण या सामन्यात आम्ही अधिक चांगली गोलंदाजी करु शकलो असतो.'

Rohit Sharma Statement:
Rohit Sharma: रोहित पुन्हा भावूक! 'या' फॅमिली मेंबरसाठी केलं अर्धशतक समर्पित?

रोहित शर्मा अजिबात खूश दिसत नव्हता

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा अजिबात खूश नव्हता. श्रीलंकेच्या 206 धावांवर 8 विकेट पडल्या होत्या आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांना श्रीलंकेला ऑलआउट करण्याची संधी होती, परंतु श्रीलंकेने पूर्ण 50 षटके खेळली. अखेरच्या षटकांमध्ये टीम इंडियाच्या खराब गोलंदाजीचा फायदा घेत श्रीलंकेने 50 षटकांत 8 गडी गमावून 306 धावा केल्या.

Rohit Sharma Statement:
Rohit Sharma: अन् हिटमॅनला पाहून छोट्या चाहत्याला कोसळले रडू, मग काय झाले पाहा Video

सामन्याच्या शेवटच्या षटकात हा वाद झाला

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका पहिल्या वनडेत 98 धावांवर फलंदाजी करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला मंकडिंग रन आउट केले होते, मात्र कर्णधार रोहित शर्माने लंकेचा कर्णधार दासुन शनाकाला फलंदाजीसाठी पुन्हा क्रीझवर बोलावले. यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही आपले शतक पूर्ण केले आणि सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माचे आभार मानले. सामन्याच्या शेवटच्या षटकातील चौथा चेंडू मोहम्मद शमीने टाकण्यापूर्वी ही घटना घडली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com