ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्मा उपकर्णधार

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत रोहित शर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. मेलबर्न कसोटीत अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करीत असताना चेतेश्वर पुजारा उपकर्णधार होता.

मेलबर्न :  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत रोहित शर्मा भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. मेलबर्न कसोटीत अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करीत असताना चेतेश्वर पुजारा उपकर्णधार होता; मात्र रोहितने संघात पुनरागमन केल्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय मंडळाने अखेरच्या दोन कसोटीसाठी संघ जाहीर करताना ही घोषणा केली.

विराट पितृत्व रजेवर गेल्यावर त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करणारे हे जितके स्पष्ट होते, तितकेच कसोटी संघात रोहितचे पुनरागमन झाल्यावर त्याच्याकडे उपकर्णधारपद दिले जाणार याचीही सर्वांना कल्पना होती. पुजारास आपण बदली उपकर्णधार आहोत, याची पूर्ण कल्पना होती, असे भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मर्यादित षटकांच्या लढतीत रोहित दीर्घ कालावधीपासून उपकर्णधार आहे. विराटच्या अनुपस्थितीत संघाबाबत निर्णय घेणाऱ्यात त्यांचा समावेश असणे क्रमप्राप्तच आहे, असेही ते म्हणाले.

रोहित मधल्या फळीत?

उपकर्णधार रोहित डावाची सुरुवात करण्याऐवजी मधल्या फळीत खेळण्याचा विचार करीत आहे. शुभमन गिल - मयांक अगरवाल ही सलामीची जोडी कायम ठेवत हनुमा विहारीऐवजी रोहितचा समावेश करण्याच्या पर्यायाबाबत विचार होत आहे. तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाचा सराव शनिवारी सुरू होणार आहे. त्याच वेळी

संबंधित बातम्या