ENG vs IND मालिकेबाबत रोहितचे मोठे विधान, भारताने मालिका जिंकली

पाचव्या कसोटी (Test) सामन्याचे काय होते, ते मला माहित नाही. जरी आम्ही फक्त एक कसोटी पुढच्या वर्षी खेळलो, तरी पण माझ्या मनात आम्ही मालिका 2-1 ने ही मालिका जिंकली आहे. मी त्याकडे बघतो.
टीम इंडियाने (Team India) ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
टीम इंडियाने (Team India) ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.Dainik Gomantak

भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पाच कसोटी मालिका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळल्या गेल्या. भारतीय संघातील करोनाच्या प्रकरणांमुळे मालिकेची पाचवी कसोटी होऊ शकली नाही. भारतीय संघ चार कसोटींमध्ये 2-1 ने पुढे होता. यानंतर असे सांगण्यात आले की, पुढील वर्षी मालिकेची पाचवी कसोटी खेळली जाईल. दरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. टीम इंडियाने (Team India) ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. असे रोहित शर्मा (Rohit Sharma) स्पष्ट केले आहे.

टीम इंडियाने (Team India) ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
ICC Test Rankings : हिटमॅन रोहित शर्मा आणि अश्विनची दमदार झेप  

पाचवी कसोटी न झाल्यामुळे, ECB ने तात्काळ एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये भारताने अंतिम कसोटीत पराभव स्वीकारल्याचे नमूद केले आहे. तथापि, काही मिनिटांनंतर मंडळाने निवेदनाचा तो भाग मागे घेतला. ईसीबीने मालिकेचा अंतिम निकाल निश्चित करण्यासाठी आयसीसीला पत्र लिहिले, पण तसे काहीच झाले नाही.

पण एका कार्यक्रमादरम्यान रोहित म्हणाला, 'पाचव्या कसोटी सामन्याचे काय होते, ते मला माहित नाही. जरी आम्ही फक्त एक कसोटी पुढच्या वर्षी खेळलो, तरी पण माझ्या मनात आम्ही मालिका 2-1 ने ही मालिका जिंकली आहे. मी त्याकडे बघतो. 'मालिकेची पहिली कसोटी नॉटिंगहॅममध्ये अनिर्णित राहिली. यानंतर, भारतीय संघाने लॉर्ड्सवर नेत्रदीपक विजयाची नोंद केली. त्यानंतर टीम इंडियाचा लीड्समध्ये पराभव झाला. भारताने साऊथम्प्टनमध्ये चौथा सामना जिंकला. ही माझी सर्वोत्तम मालिका नाही. मला वाटते माझे सर्वोत्तम येणे अजून बाकी आहे. साऊथॅम्प्टन येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वीचा वेळ मी कोणत्या प्रकारच्या तंत्र आणि मानसिकतेची गरज आहे हे शोधण्यासाठी वापरला. मी खूप खूश होतो आणि पुढे त्याचा वापर करू इच्छितो.

टीम इंडियाने (Team India) ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
ENG vs IND यांच्यात रद्द झालेला कसोटी सामना पुढील वर्षी होणार

इंग्लंड दौऱ्यादरम्यान, भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यानंतर मुख्य फिजिओ नितीन पटेल, त्यांचे जवळचे संपर्क मानले जातात, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना विलगिकरणात ठेवण्यात आले. पटेल यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांनी संघाची जबाबदारी स्वीकारली पण नंतर ते देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मँचेस्टरमधील पाचवी आणि शेवटची कसोटी रद्द करण्यात आली.

तो दौरा रोहितसाठी यशस्वी ठरला, त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूट नंतर मालिकेत सर्वात जास्ती धावा काढल्या आहेत. त्याने चार सामन्यांमध्ये 52.57 च्या सरासरीने 368 धावा केल्या तसेच सलामीवीर म्हणून परदेशी भूमीवर पहिले शतक तर दोन अर्धशतके केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com