ऋषभ पंतसाठी रोहितने केली विनंती; जाणून घ्या

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

पंतला एकट्याला सोडा तो तुम्हाला उत्तम कामगिरी करुन दाखवेल, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आधी ऑस्ट्रेलिया त्यानंतर इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत ऋषभ पंत त्याच्य़ा जबरदस्त खेळीमुळे चर्चेत आला. दरम्यान रोहित शर्मा याने प्रसारमाध्यमांना ऋषभ पंतवर दबाव न आणण्याची विनंती केली आहे. भारत- इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु होण्यापूर्वी रोहीतने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ऋषभ पंतला जर त्याच्या मनासारखे खेळण्याची मुभा दिल्यास त्याने आत्ता ज्या दमदारपणे कामगिरी केली त्याप्रमाणे अशीच कामगिरी यापुढेही करत राहील.

ऋषभ पंतचा कामगिरी यापुढे उंचावत राहील असं सांगताना रोहीतने प्रसारमाध्यमांनाच एक प्रश्न विचारला. ‘’आम्ही त्याला एकटं सोडलेलं असून त्याला त्याच्या मनासारखा खेळ खेळण्याची मुभा दिली आहे. संघ व्यवस्थापन म्हणून आम्ही हे करण्यासाठी तयार आहोत. मला तुम्हाला प्रसारमाध्यम म्हणून हाच प्रश्न की, तुम्ही हे करण्यासाठी तयार आहात का?’’ असं रोहितने माध्यमांना विचारलं.

विराटvsबाबर: पाकिस्तानी खेळाडू कोहली-बाबरच्या तुलनेवरून का भडकला?

‘’ऋषभ पंतला त्याच्या मनासारखे खेळू द्या आणि तुम्हाला तो अशा अनेक खेळी दाखवेल. मी याआधीही अनेकदा सांगितले आहे की, पंतला एकट्याला सोडा तो तुम्हाला उत्तम कामगिरी करुन दाखवेल, असं रोहित शर्माने म्हटलं आहे. त्याची खेळी उंचावत जाणार आहे. त्याला पुन्हा मागे वळून पहावे लागणार नाही. आता त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरोधात उत्तम कामगिरी करुन दाखवली आहे,’’ असं कौतुक रोहितने यावेळी केलं 

संबंधित बातम्या