रोझमन क्रूझने जिंकला ‘गोवा टायगर कप’

राज्यस्तरीय विजेते : ड्युन्स क्लबवर दोन गोलने मात, स्टीफन सतरकर स्पर्धेचा मानकरी
Goa Tiger Cup
Goa Tiger CupDainik Gomantak

पणजी: नागोवा-वेर्णा येथील रोझमन क्रूझ क्लबने मांद्रेच्या ड्युन्स स्पोर्टस क्लबवर 2-0 फरकाने चमकदार विजय नोंदवला. आणि गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीच्या टायगर कप अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धा जिंकली. कांदोळी येथील डॉ. गुस्ताव मोंतेरो मैदानावर सोमवारी अंतिम सामना झाला. (Rosemann Cruz wins Goa Tiger Cup )

या सामन्यात रोझमन क्रूझचा स्टीफन सतरकर स्पर्धेचा मानकरी ठरला, तर याच संघाच्या रोमारियो दा कॉस्ता याने सामनावीर पुरस्कार पटकावला. ड्युन्स क्लबचा ह्रषीकेश किनळेकर स्पर्धेतील उत्कृष्ट गोलरक्षक ठरला. विजेत्या रोझमन क्रूझ संघाला करंडक व एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या ड्युन्स क्लबला करंडक आणि 60 हजार रुपये बक्षीस मिळाले. विभागीय पातळीवर उपविजेतेपद मिळालेल्या असोल्डेच्या सेंट अँथनी स्पोर्टस क्लब (दक्षिण) आणि गोवा वेल्हा स्पोर्टस क्लब (उत्तर) यांना प्रत्येकी 30 हजार रुपये व करंडक देण्यात आला.

Goa Tiger Cup
जॉस बटलरने आयपीएल बक्षीस समारंभात 'हे' 6 पुरस्कार केले नावावर

यावेळी बक्षीस वितरण भारतीय फुटबॉल प्रशिक्षक संघटनेचे संचालक दिनेश नायर, भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डेन्झिल फ्रान्को, ग्रेगरी डिसोझा, जॉनी फर्नांडिस, गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीचे अध्यक्ष फाबियन डिसोझा, मारियो आगियर, माजी मिसेस इंडिया अर्थ उपविजेती (2019) जेसिका स्नॉक यांच्या उपस्थितीत झाले. महाराष्ट्राचे मंत्री व मुंबई फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली.

दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल

चुरशीच्या अंतिम लढतीत रोझमन क्रूझ संघाने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल नोंदवून विजेतेपदाच्या करंडकावर नाव कोरले. स्टीफन सातारकर याच्या भेदक हेडिंगमुळे त्यांना 25 व्या मिनिटास आघाडी मिळाली. सामन्याच्या 55 व्या मिनिटास शेल्डन परेराने गोल करून रोझमन क्रूझची आघाडी भक्कम केली. त्यामुळे ड्युन्स क्लबला मुसंडी मारणे कठीण ठरले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com