RSAvsPAK : चुकीला माफी नाही; झमानला फसवणं आफ्रिकेला महागात पडलं

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर फखर झमान धावबाद झाला. त्याच्या विकेटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.

जोहान्सबर्ग: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर फखर झमान धावबाद झाला. त्याच्या विकेटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे. झमान द्विशतक झळकावण्याच्या जवळ होता. त्याने शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर झटपट धाव घेतली. पण दरम्यान असे काही झाले की त्याला दुसऱ्या दुहेरी शतकापासून मुकावे लागले. मार्करमच्या थ्रोवर पडलेली त्याच्या विकेटनंतर वाद निर्माण झाला आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दिग्गज फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याच्यावर फेक फिल्डिंग केल्याचा आरोप लावला जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यात त्याने असे काहीतरी केले ज्यामुळे त्याच्यावर बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 341 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरले.  सलामीवीर फखर झमान याने एकाकी खिंड लढवली. त्याने सामना शेवटपर्यंत नेला. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 31 धावांची गरज होती. फखर झमान 192 धावांवर खेळत होता. 

लुंगी निगिडीच्या  डावाच्या 50 व्या षटकात आला आणि पहिल्याच चेंडूवर फखर झमानने चेंडू दोन धावांसाठी खेळला. एडन मार्करामने बाऊंड्री लाइनमधून चेंडू उचलला आणि किपरच्या दिशेने फेकला. मात्र क्विंटन डी कॉकने असे हावभाव केले की जणू थ्रो नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने फेकला गेलाय. डी कॉकची प्रतिक्रिया पाहून फखर झमानही अस्वस्थ झाला आणि त्याने धावणे बंद केले. त्याला वाटले की चेंडू त्यांच्याकडे येत नाही. थ्रो थेट विकेटकीपरच्या स्टम्पवर आला आणि फखर झमान धावबाद झाला. क्विंटन डी कॉकने त्याला आपल्या जाळ्यात अडकविले. यानंतर पाकिस्तानने हा सामना गमावला. मात्र, या कृत्याबद्दल डी कॉक यांच्यावर टीका झाली असून फेक फिल्डिंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे. 

IPL 2021: रसेलच्या अफलातून ‘शॉट’ मुळे दिनेश कार्तिक जमिनीवर कोसळला 

डिकॉकच्या फेक फिल्डिंगमुळे आयसीसीने त्याला दंड ठोठावला आहे. त्याच्या मॅच फीजच्या 75 टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे. तर दक्षिण आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमा याच्या फीजमधून 20 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

डिकॉकच्या इशाऱ्याकडे फकरने पाहिले आणि त्यालाही वाटलं आता फिल्डर नॉन स्टायकर एंडला बॉल फेकणार… पण फिल्डरने डिकॉकच्या दिशेने बॉल फेकताच बॉलने बरोबर स्टम्पचा वेध घेतला. डिकॉकच्या फेक फिल्डिंगमुळे फकर झमानला 193 धावांवर विगेट गमावण्याची वेळ आली. सामना पाकिस्तानने गमावल्यानंतरही झमानला ‘मॅन ऑफ द मॅच’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

संबंधित बातम्या