IPL 2022: '....CSK ची झाली दुरावस्था,' या दिग्गजाने केला खुलासा

चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15व्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
Chennai Super Kings
Chennai Super KingsDainik Gomantak

चेन्नई सुपर किंग्ज इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 15व्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्यांना अंतिम-4 मध्ये स्थान मिळवता आले नाही. IPL-2022 (IPL 2022) मध्ये, चार वेळचा विजेता प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला. लागोपाठच्या पराभवाचा फटका त्यांना सहन करावा लागला. या मोसमातील चेन्नईची कामगिरी पाहिली तर 14 सामन्यापैकी केवळ 4 सामन्यांत विजय मिळवला तर 10 सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने यंदाचा हंगाम नवव्या स्थानावर संपवला. यातच आता सलामीवीर ऋतुराज गायकवाडने संघाच्या खराब कामगिरीचे कारण सांगितले आहे. (Ruturaj Gaikwad has given the reason for the poor performance of the Chennai Super Kings)

दरम्यान, आपला संघ अपेक्षेनुसार कामगिरी करु शकला नाही. त्यामुळेच आपली ही अवस्था झाल्याचे ऋतुराजने म्हटले आहे. ऋतुराज गेल्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने चेन्नईच्या (Chennai Super Kings) विजेतेपदात मोठी भूमिका बजावली होती, परंतु या मोसमात त्यालाही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

Chennai Super Kings
IPL 2022 Play-Offs Schedule: जाणून घ्या कधी अन् कोणते संघ येणार आमने-सामने

आम्ही चांगले खेळलो नाही - गायकवाड

यंदाच्या हंगामात संघाला अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही मात्र पुढच्या मोसमात दमदार पुनरागमन करणार असल्याचे ऋतुराजने म्हटले. सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (Rituraj Gaikwad) हवाल्याने सांगण्यात आले की, “अनेक लोक म्हणाले की, आमच्याकडे नशीब नाही. गोष्टी आमच्या बाजूने जात नाहीत. खरं सांगायचं तर आम्ही अपेक्षेप्रमाणे खेळलो नाही. पण मी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला अनेक गोष्टी स्वीकारुन पुढं जावं लागेल. तुमचा (CSK चाहत्यांचा) आम्हाला पाठिंबा आहे. पुढच्या मोसमात संघ दमदार पुनरागमन करेल.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com