
भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) चाहत्यांनी बेंगळुरूमध्ये एका ग्राउंड्समनशी असभ्य वर्तन केल्याबद्दल सोशल मीडियावर टीका केली आहे. (Ruturaj Gaikwad rude behavior towards groundman condemned by fans)
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गायकवाडने चाहत्यासोबत सेल्फी काढण्यास नाकार दिल्याचे त्या व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे आणि ते पाहून चाहते चांगलेच संतापले आहेत. पावसामुळे खेळ लांबल्याने दोन्ही फलंदाज डगआऊटमध्ये अडकले होते.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पावसामुळे खेळ सुरू होण्यास उशीर झाला तेव्हा रुतुराज गायकवाड आणि त्याचा सहकारी इशान किशन (Ishan Kishan) डगआउटमध्ये थांबले होते त्यावेळी एक ग्राउंड्समन गायकवाडच्या जवळ आला आणि त्याच्या बाजूला बसला.
त्यानंतर ग्राउंड्समनने गायकवाड सोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, तर गायकवाडने ती सेल्फी नाकारत त्या ग्राउंड्समनला बाजूला सारले. त्यानंतर गायकवाड दुसरीकडे पहायला लागला. ग्राउंड्समनने पुन्हा सेल्फी मागितला तरी गायकवाड यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्याला आपल्यापासून लांब जाण्यास सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गायकवाडचा हा व्हिडीओ आणि त्याच्या या वागणुकीला भारतीय चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला नाही. रुतुराज गायकवाड यांनी ग्राउंड्समनचा कसा अनादर केला याबद्दल चाहत्यांनी त्यांचे मत आणि त्यांची निराशा व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर जारदार टिका करण्यास सुरुवात केली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेमध्ये रुतुराजने चांगली खेळी खेळली नाही. तो 5 सामन्यांमध्ये फक्त 96 धावा करू शकला आणि 2022 च्या आयसीसी विश्वचषकापूर्वी निवडकर्त्यांना प्रभावित करण्यात तो अयशस्वी देखील ठरला. गायकवाडने आज पॅव्हेलियनमध्ये परत येण्यापूर्वी 12 चेंडूंमध्ये फक्त 10 धावा केल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.