ऋत्विज परबचे आणखी एक विजेतेपद

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

फिडे मास्टर नीतिश बेलुरकर उपविजेता ठरला. त्यानेही आठ गुण नोंदविले, पण सरस टायब्रेकर गुणांत ऋत्विजने अव्वल क्रमांक पटकाविला. पार्थ साळवी याने सात गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला.  

पणजी- गोवा ऑनलाईन लीग बुद्धिबळ मालिकेत आणखी एक विजेतेपद मिळविताना ऋत्विज परब याने पेडणे तालुका बुद्धिबळ संघटनेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला.

ऋत्विजने नऊ फेऱ्यांतून आठ गुणांची कमाई केली. फिडे मास्टर नीतिश बेलुरकर उपविजेता ठरला. त्यानेही आठ गुण नोंदविले, पण सरस टायब्रेकर गुणांत ऋत्विजने अव्वल क्रमांक पटकाविला. पार्थ साळवी याने सात गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला.  

राज्यस्तरीय मालिकेत आता विजेतेपदासाठी नीतिश व ऋत्विज यांच्यात चुरस असेल. मालिकेतील १० स्पर्धांनंतर नीतिशने पाच सुवर्ण, चार रौप्य व एका ब्राँझपदकाची कमाई केली आहे. ऋत्विजने चार सुवर्ण, दोन रौप्यपदके जिंकली आहेत. मालिकेतील आणखी दोन स्पर्धा बाकी आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील व्हिवान बाळ्ळीकरने एक स्पर्धा जिंकली आहे. सांगे आणि धारबांदोडा बुद्धिबळ संघटनेच्या स्पर्धा बाकी आहेत. आणखी एक स्पर्धा जिंकल्यास नीतिश राज्यस्तरीय विजेता ठरेल. सांगे तालुक्याची स्पर्धा रविवारी (ता. २५) खेळली जाईल.

पेडणे तालुका संघटनेच्या स्पर्धेत मंदार लाड, तन्वी हडकोणकर, आयुष शिरोडकर, रूबेन कुलासो, देवेश नाईक, शेन ब्रागांझा, वसंत नाईक, साईराज वेर्णेकर, जॉय काकोडकर, स्वेरा ब्रागांझा, यश उपाध्ये, व्हिवान बाळ्ळीकर यांनी अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक मिळविला. अन्य गटात स्नेहल नाईक, सारस पोवार, दिया सावळ, एथन वाझ, राशेल परेरा, एड्रिक वाझ, आर्या दुबळे, श्लोक धुळापकर, सानी गावस, अविनाश बोरकर, धीरज देसाई हे खेळाडू बक्षीसप्राप्त ठरले. 
 

संबंधित बातम्या