सचिन आणि युसूफ नंतर अजून एक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात

दैनिक गोमंतक
रविवार, 28 मार्च 2021

दिवसेंदिवस कोरोना  विषाणूच्या संक्रमणाचा वेग वाढतच जात असून, क्रिकेटवर सुद्धा कोरोनाचे सावट आल्याचे दिसते आहे.

दिवसेंदिवस कोरोना  विषाणूच्या संक्रमणाचा वेग वाढतच जात असून, कोरोना बाधित झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे. याच पार्श्वभूमीवर देशातल्या अनेक राज्यांत अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोनाने क्रिकेटमध्ये सुद्धा शिरकाव केल्याचे दिसते आहे. भारतीय संघाचा फलंदाज के. बद्रीनाथने आपली कोरोना चाचणी सकारात्मक आल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे क्रिकेटवर सुद्धा कोरोनाचे सावट आल्याचे दिसते आहे. (s. badrinath tested covid-19 positive)

आपण कोरोना बाधित झाल्याची माहिती देताना, "माझी कोरोना  (Covid-19) चाचणी सकारात्मक आली असून, आवश्यक असलेली सर्व खबरदारी घेत आहोत" या आशयाचे ट्विट एस. बद्रीनाथने केले. तसेच, आपल्याला कोरोना  ची साधारण लक्षणं दिसून येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच विलगीकरणात राहून आपल्यावर उपचार सुरु आहेत." असे त्याने सांगितले आणि इतरांना देखील काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला. बद्रीनाथने दोन कसोटी, सात एकदिवसीय सामाने आणि एक टी -20 (T-20) आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे (India) प्रतिनिधित्व केले. यापूर्वी शनिवारी सचिन तेंडुलकर आणि युसुफ पठाण यांनी कोरोना   चाचणी  सकारात्मक आली असल्याची माहिती दिली होती.

नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि एस. बद्रीनाथ (S Badrinath) यांनी इंडिया लेजेंड्ससाठी  एकच ड्रेसिंग रूम वापरल्याचे समजते आहे. रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामान्यानंतर युसुफने शनिवारी ट्विटरवर माहिती दिली होती की,  आपली कोरोना   चाचणी सकारात्मक आली असून, आपण  घरीच विलगीकरणात राहून आवश्यक असलेले उपचार घेत आहोत. तसेच संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कोरोना  ची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील यावेळी युसूफ पठाण यांनी केले. 

INDvsENG 3rd ODI: मैदानावर उतरताच विराट कोहलीच्या नावावर झाला अनोखा विक्रम 

संबंधित बातम्या