सचिन- सेहवागला आऊट करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू बनलायं टॅक्सी ड्रायव्हर!

सचिन- सेहवागला आऊट करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू बनलायं टॅक्सी ड्रायव्हर!
ASHRAD KHAN.jpg

भारतातील (Inida) बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि गरीब, हे ऐकूण आश्चर्यकारक वाटते. पण आपल्या शेजारील देश असणाऱ्या पाकिस्तानमधील (Pakistan) परिस्थिती अगदी त्याच्या उलट आहे. 2006 मध्ये भारतीय संघाविरुध्द (Indian team) शानदार गोलंदाजीद्वारे आपला वेगळा ठसा उमटवणारा पाकिस्तानचा ऑफस्पिनर अशरद खान (Ashrad Khan) आता दारिद्र्यात जगत आहे.

वेस्ट इंडिजविरुध्द 1997-98  पदार्पण करणारा ऑफस्पिनर अशरद खान आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील (Australia) सिडनी (Sydney) शहरात कॅब चालवत आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला त्याच्या कुटुंबासाठी एवढा संघर्ष करावा लागतो, हे अगदीच क्लेशदायक आहे.(Sachin Sehwags dismissal becomes Pakistans ha taxi driver)

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) विकेट अरशद खानने त्याच्या पहिल्याच सामन्यात घेतली होती. तसेच विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) त्याच्या चेंडूंसमोर संघर्ष करत होता. अरशद खानने इंडियन सुपर लीगमध्ये (Indian Super League) हैदराबाद संघाकडून (Hyderabad Sangha) खेळला आहे. निवृत्तीनंतर हा खेळाडू आर्थिक पेचात सापडला.

अशरद खानची कारकिर्द
अशरद खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 9 कसोटी सामन्यात 32 बळी घेतले होते. त्याचबरोबर त्याने पाकिस्तान संघाबरोबर 60 वनडे सामने देखील खेळले आहेत. ज्यात त्याच्या खात्यात 57 बळी आहेत. अशरदच्या नावावर 601 प्रथम श्रेणी आणि 89 लिस्ट ए बळी आहेत. त्याच्या कामगिरीकडे पाहता, तो किती उत्कृष्ठ गोलंदाज होता हे सिध्द होते.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com