
U19 India Women Team: भारताच्या 19 वर्षांखालील महिला संघाने रविवारी (29 जानेवारी) रोजी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला टी20 वर्ल्डकपचे विजेतेपद जिंकले. यानंतर त्यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचदरम्यान बीसीसीआयकडून या विश्वविजेत्या युवा संघाचा सन्मान केला जाणार आहे. याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी माहिती दिली आहे.
रविवारी झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील इंग्लंडच्या महिला संघाचा 7 विकेट्सने पराभव करत भारताच्या युवा महिला संघाने विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते. विशेष म्हणजे भारतीय महिला क्रिकेटमधील हे आयसीसीचे पहिले विजेतेपद आहे.
आता या विश्वविजेतेपदानंतर 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाचा सन्मान बुधवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर केला जाणार आहे. हा सन्मान सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे विश्वविजेत्या भारतीय महिला संघाचा गौरव मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते केला जाणार आहे.
याबद्दल जय शाह यांनी ट्वीट केले आहे की 'मला हे सांगताना आनंद होत आहे क भारतरत्न श्री सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या हस्ते विश्वविजेत्या 19 वर्षांखालील भारतीय संघाचा १ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्या. 6.30 वाजता सन्मान केला जाणार आहे. युवा क्रिकेटपटूंनी भारताचा गौरव वाढवला आहे आणि आम्ही त्यांच्या यशाचा सन्मान करणार आहे.'
(Sachin Tendulkar and BCCI Office Bearers will felicitate U19 India Women for winning U19 T20I World Cup)
तसेच रविवारीच जय शाह यांनी असेही घोषित केले होते की 19 वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला 5 कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहे. दरम्यान, 19 वर्षांखालील भारतीय महिला संघ मंगळवारी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईला पोहचणार आहे. त्यानंतर ते बुधवारी अहमदाबादला जातील.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा सामना देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याला 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 19 वर्षांखालील भारतीय महिला संघाचा सन्मान केला जाणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.