मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल
Sachin Tendulkar hospitalized infected with Covid 19 virus

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कोरोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक आठवड्यापूर्वी, त्याने कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती आणि त्याने स्वत: ला घरात क्वारंटाइन करून घेतले होते. यानंतर मास्टर ब्लास्टर यांनी शुक्रवारी ट्विटरवर माहिती दिली की या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळजी करण्याची फारशी गरज नाही कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सावधगिरी बाळगण्यासाठी सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तो लवकरच घरी परतणार असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 27 मार्च रोजी सचिनने आपल्या ट्विटर हँडलवरून तो कोरोना पॉझीटिव्ह असल्याची माहिती सर्वांसोबत शेअर केली होती.

'तुम्ही प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्या लक्षात घेऊन, मला पूर्ण खबरदारी घेण्यास रुग्णालयात दाखल केले गेले. मला आशा आहे की येत्या काही दिवसांत मी घरी परत येईल. प्रत्येकजण स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, असे  या महान फलंदाजाने आज सकाळी पुन्हा आपल्या ट्विटरवर लिहिले.

यावेळी 47 वर्षीय सचिनने विश्वचषक विजयाच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व देशवासीय आणि भारतीय संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. २०११ मध्ये याच दिवशी या एमएस धोनीच्या नेतृत्वात श्रीलंकेला पराभूत करून दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. सचिन तेंडुलकरसुद्धा या विश्वचषक विजेत्या संघाचा एक भाग होता.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com