सचिनला सलामीला खेळवल्यानेच त्याच्या जास्त धावा; गांगुलीचे मत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

सुरुवातीच्या काही सामन्यानंतर गांगुली यांनी धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. पाकविरुद्ध विशाखापट्टणमला तिसऱ्या क्रमांकावर खेळताना धोनीने १४८ धावांचा तडाखा दिला होता. 

कोलकता: सलामीस खेळण्यास सुरुवात झाल्यावर सचिन तेंडुलकरकडून जास्त धावा होण्यास सुरुवात झाली. आपण महेंद्रसिंग धोनीबाबतही हाच निर्णय घेतला, त्यामुळे त्याच्याकडून जास्त धावा होण्यास सुरुवात झाली, असे भारताचे माजी कर्णधार तसेच भारतीय मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. 

सुरुवातीच्या काही सामन्यानंतर गांगुली यांनी धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. पाकविरुद्ध विशाखापट्टणमला तिसऱ्या क्रमांकावर खेळताना धोनीने १४८ धावांचा तडाखा दिला होता. 

धोनी तिसऱ्या क्रमांकावर खेळला, त्यावेळी त्याला जास्त षटके खेळण्याची संधी मिळाली, त्याने धावाही जास्त केल्या. तेंडुलकर सहाव्या क्रमांकावरच खेळत राहिला असता तर तो महान फलंदाज झाला नसता, या क्रमांकावर खेळताना पुरेसे चेंडू लाभत नाहीत, याकडे गांगुली यांनी लक्ष वेधले. 

चॅलेंजर स्पर्धेत धोनीने सलामीला येऊन शतक केले होते. आघाडीच्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास  खेळाडू तयार होतो. कारकीर्दीच्या सुरुवातीस त्याने मुक्तपणे खेळणे आवश्‍यकच असते, असे गांगुली यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या