सचिन तेंडुलकरचा मुलगा उतरणार आयपीएलच्या मैदानात; 'या' संघाकडून दिसेल खेळताना 

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातील (आयपीएल 2021) लिलाव आज चेन्नईत झाला.

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातील (आयपीएल 2021) लिलाव आज चेन्नईत झाला. खेळाडूंच्या अंतिम लिलाव यादीपैकी (आयपीएल लिलाव 2021) सर्व फ्रेंचायझींनी 61 रिक्त जागांसाठी बोली लावली. आज झालेल्या लिलाव यादीत 164 भारतीय, 125 परदेशी व सहयोगी देशांतील 3 खेळाडूंना स्थान मिळाले होते. आयपीएलच्या लिलावा दरम्यान, सर्वात जास्त किंमतीत कोणता खेळाडू खरेदी केला गेला व कोणता खेळाडू कोणत्या संघाशी संबंधित होता आणि कोणत्या फ्रेंचायझीने सर्वाधिक खेळाडू विकत घेतले, यावर सर्वांचे लक्ष असतं.

आयपीएल 2021 साठीचा लिलाव सर्वात आधी भारतीय फलंदाज करुण नायरच्या 50 लाखांच्या बेस किंमतीसह सूरू झाला. मात्र कसोटीच्या पहिल्या टप्प्यात तिहेरी शतकी करणाऱ्या या खेळाडूसाठी कोणत्याही संघाने बोली लावली नाही. आज झालेल्या लिलावात दोन कोटींच्या बेस प्राइजसह सुरु झालेल्या ख्रिस मॉरिसचा राजस्थान रॉयल्स संघाने 16.25 कोटींच्या बोलीसह संघात समावेश केला. आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2016 मध्ये युवराज सिंगसाठी 16 कोटींची बोली लावली होती. तर अनकॅप खेळाडूंच्या यादीत कृष्णाप्पा गौतम हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्जने 9.25 कोटींच्या बोलीसह के गौतम या अष्टपैलू फिरकीपटू खेळाडूला आपल्या संघात सहभागी करून घेतले.      

ISL2020-21 एटीके मोहन बागानला एएफसी चँपियन्स लीगची संधी; ईस्ट बंगालची...

त्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरवर देखील बोली लावण्यात आली. अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईज 20 लाख होती. व मुंबई इंडियन्सच्या संघाने अर्जुन तेंडुलकरला 20 लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी करत आपल्या संघात घेतले आहे. सचिन तेंडुलकर देखील आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाचाच भाग होता. 

दरम्यान, अर्जुन तेंडुलकरला पहिल्यांदाच मुंबईच्या सीनिअर संघात स्थान मिळाले होते. डावखुरा जलदगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईच्या 22 सदस्यांच्या संघात समावेश करण्यात आला होता. आणि यावेळेस त्याने दोन सामने खेळले होते. त्यामुळे यंदाच्या आयपीएल लिलावासाठी तो पात्र ठरला होता. यापूर्वी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या ज्यूनिअर संघातून खेळला आहे.  

संबंधित बातम्या