Ranji Trophy 2022: 'या' 22 वर्षीय खेळाडूने पदार्पणाच्या सामन्यातच रचला इतिहास

बिहार रणजी संघासाठी सर्वात मोठी खेळी करत साकिबुल (Sakibul Gani) त्रिशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.
Sakibul Gani
Sakibul GaniDainik Gomantak

रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात बिहारच्या 22 वर्षीय खेळाडूने दमदार खेळी केली आहे. बिहारच्या साकिबुल गनीने मिझोरामविरुद्ध त्रिशतक झळकावून इतिहास रचला. बिहार रणजी संघासाठी सर्वात मोठी खेळी करत साकिबुल त्रिशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. रणजीच्या दुसऱ्या दिवशी त्याने 341 धावांची खेळी खेळली. (Sakibul Gani Of Bihar Made History By Scoring Three Centuries Against Mizoram)

दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) पहिल्या लेगच्या दुसऱ्या दिवशी बिहार आणि मिझोराम यांच्यात झालेल्या सामन्याची इतिहासामध्ये नोंद झाली आहे. अवघ्या 22 वर्षाच्या साकिबुलने बिहारसाठी (Bihar) पहिल्यांदा त्रिशतक झळकावले. मिझोरामविरुद्ध (Mizoram) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या संघाने या त्रिशतक आणि बाबुल कुमारच्या द्विशतकाच्या जोरावर धावसंख्या 650 धावांच्या पुढे घेऊन गेले.

Sakibul Gani
Ranji Trophy 2022: गोव्याची सलामी ओडिशाशी

साकिबुलने इतिहास रचला

मिझोरामविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना साकिबुलने बिहार संघासाठी 341 धावांची शानदार खेळी उभारली. या खेळीत त्याने 56 चौकार आणि 2 षटकार मारले. यादरम्यान त्याने केवळ 405 चेंडूंचा सामना केला. याआधी जगातील कोणत्याही फलंदाजाने प्रथम श्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकावले नव्हते.

Sakibul Gani
Ranji Trophy 2022 चे वेळापत्रक झाले जाहीर, 8 शहरांमध्ये होणार सामने?

बिहारकडून पहिले त्रिशतक

रणजी ट्रॉफीमध्ये बिहारने झळकावलेले हे पहिले त्रिशतक आहे. यापूर्वी 1967 मध्ये आनंद शुक्लाने नाबाद 241 धावा केल्या होत्या. साकीबुलचा पहिला प्रथम श्रेणी सामना होता. आणि विशेष म्हणजे पहिल्याच सामन्यात त्रिशतक करणारा तो पहिला भारतीय ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com