प्रीमियर लीग क्रिकेट : साळगावकर क्लबची दमदार वाटचाल
Premier League cricketDainik Gomantak

प्रीमियर लीग क्रिकेट : साळगावकर क्लबची दमदार वाटचाल

शतकवीर प्रथमेश,वैभवने एमसीसीला सतावले

पणजी : सलामीचा प्रथमेश गावस 107 व वैभव नाईक नाबाद 103 या डावखुऱ्या फलंदाजाने रविवारी एमसीसी संघाच्या गोलंदाजांना चांगलेच सतावले, त्यामुळे जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी साळगावकर क्रिकेट क्लबला दमदार वाटचाल राखता आली. (Salgaocar Club dominates Premier League cricket)

Premier League cricket
मार्कस स्टॉइनिसने ठोकल्या '1000 धावा', जीवनदान मिळाल्याचा उचलला फायदा

सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या या तीन दिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर साळगावकर क्लबने 5 बाद 286 धावा केल्या. स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी या सामन्यातील निकाल दोन्ही संघांना महत्त्वपूर्ण आहे. एमसीसी संघाने नाणेफेक जिंकून साळगावकरला क्लबला फलंदाजीस पाचारण केले.

Premier League cricket
दिल्ली कॅपिटल्सने 3 गोष्टींची घेतली काळजी आणि कुलदीप यादवची चमकली कारकीर्द

प्रथमेश व वैभव यांनी चौथ्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी केल्यामुळे साळगावकर क्लबला सामन्याची सूत्रे हाती घेता आली. फिरकी गोलंदाज वैभव गोवेकरने यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ याच्याकरवी प्रथमेशला झेलबाद करून जमलेली जोडी फोडली. प्रथमेशने 199 चेंडूंचा सामना करताना 18 चौकार मारले. दिवसअखेर नाबाद राहिलेल्या वैभवने 209 चेंडूंतील संयमी खेळीत 13 चौकार लगावले.

सुमीरन आमोणकर (1) व ईशान गडेकर (2) यांना अनुक्रमे विजेश प्रभुदेसाई व हेरंब परब यांनी बाद केले तेव्हा साळगावकर क्लबची स्थिती 2 बाद 17 अशी होती. नंतर यश पोरोब (33) याने प्रथमेशला चांगली साथ दिली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. यशला कौशल हट्टंगडीने पायचीत बाद केले. त्यानंतर प्रथमेश व वैभवने एमसीसीच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. या जोडीची कूच रोखण्यासाठी तब्बल आठ गोलंदाज वापरावे लागले.

संक्षिप्त धावफलक

साळगावकर क्रिकेट क्लब, पहिला डाव : 86 षटकांत 5 बाद 286 (प्रथमेश गावस 107, यश पोरोब 33, वैभव नाईक नाबाद 103, रोहित धारेश्वर नाबाद 16, विजेश प्रभुदेसाई 2-50, हेरंब परब 1-37, कौशल हट्टंगडी 1-33, वैभव गोवेकर 1-28).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.