'साळगावकर`ची मनोरा क्लबवर मात

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

साळगावकर एफसीने गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर यूथ क्लब मनोरा संघास 1-0 फरकाने हरविले.

पणजी: साळगावकर एफसीने गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर यूथ क्लब मनोरा संघास 1-0 फरकाने हरविले. सामना मंगळवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. 

सेल्विन मिरांडा याने सामन्याच्या पूर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला. सामन्याच्या 26व्या मिनिटास सणसणीत फ्रीकिकवर सेल्विनने थेट गोल नोंदविला. गोलक्षेत्राबाहेर मनोरा संघाच्या जेह विल्यम्सन याने सेल्विन याला पाडल्यानंतर फ्रीकिकचा निर्णय रेफरीने घेतला.

मुंबई सिटी प्रथमच ISLच्या अंतिम फेरीत; एफसी गोवावर 6-5 फरकाने मात

विश्रांतीपूर्वी सेल्विनला आणखी एक गोल करण्याची संधी होती, परंतु त्याचा धोकादायक फटका थोडक्यात हुकला. उत्तरार्धात मलाप्पा याचा फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे साळगावकरची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

संबंधित बातम्या