गोवा प्रोफेशनल लीग : साळगावकर एफसीची विजयी सलामी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी साळगावकर एफसीने विजयी सलामी दिली. त्यांनी एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघावर 2 - 0 फरकाने मात केली.

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी साळगावकर एफसीने विजयी सलामी दिली. त्यांनी एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघावर 2 - 0 फरकाने मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. स्पर्धेला बुधवारपासून सुरवात झाली.

गोवा एएफसी चँपियन्स लीगच्या ई गटात

माजी विजेत्या साळगावकर एफसीच्या खाती सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी एक गोल नोंदीत झाला. साईश हळर्णकर याने 39व्या मिनिटास साळगावकरला पेनल्टी फटक्यावर आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटास बदली खेळाडू स्टीफन सतरकर याने संघाचे पूर्ण तीन गुण निश्चित केले.

आयएसएल : हैदराबादची नजर आता तिसऱ्या क्रमांकावर

पेनल्टी क्षेत्रात एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाच्या माल्सॉमत्लुआंगा राल्टे याच्या हाताला अचानक चेंडू लागल्यामुळे रेफरीने साळगावकर एफसीसाठी पेनल्टी फटक्याची खूण केली. त्यावेळी साईशने अचूक फटका मारला. साळगावकरच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना स्टीफनने उजव्या बाजूने मुसंडी मारत एफसी गोवाचा गोलरक्षक डायलन डिसिल्वा याला चकविले.

 

संबंधित बातम्या