Goa Professional League Football Tournament: साळगावकर एफसीची विजयी घोडदौड

दैनिक गोमन्तक
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

साळगावकर एफसीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड राखताना सोमवारी वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 3 - 0 फरकाने सोपा विजय प्राप्त केला.

पणजी : साळगावकर एफसीने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी घोडदौड राखताना सोमवारी वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 3 - 0 फरकाने सोपा विजय प्राप्त केला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

साळगावकर एफसीच्या विजयात स्टीफन सतरकर याने दोन गोल केले. त्याने पहिला गोल 39व्या मिनिटास केला. नंतर उत्तरार्धातील खेळात 78व्या मिनिटास स्टीफनने आणखी एक गोल नोंदविला. सामन्याच्या 87व्या व्हालेंटिन नाझारेथच्या गोलने साळगावकरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मागील लढतीत चर्चिल ब्रदर्सवर मोठा विजय नोंदविलेल्या साळगावकर एफसीने सलग दुसऱ्या लढतीत पूर्ण तीन गुणांची कमाई केली.

IndvsEng Day 4th: अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संघ 178 धावांवर आटोपला;...

स्टीफनने पहिला गोल सेल्विन मिरांडाच्या शानदार क्रॉस पासवर नोंदविला. सामन्यातील दुसरा गोल नोंदविताना स्टीफनने व्हालेंटिनच्या असिस्टवर प्रतिस्पर्धी गोलरक्षकास गुंगारा दिला. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना रिभवच्या पासवर व्हालेंटिनने अचूक फटका मारून संघाच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली.

स्पर्धेत मंगळवारी (ता. 9) धुळेर-म्हापसा येथील स्टेडियमवर धेंपो स्पोर्टस क्लब व एफसी गोवा यांच्यात सामना होईल.
 

संबंधित बातम्या