सानिया मिर्झाला मुलगा झाल्यानंतर परत खेळता येईल का याची खात्री नव्हती..
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020
गरोदर असताना २३ किलो वजन वाढले होते, त्यामुळे बाळंतपणानंतर पुन्हा खेळू शकेन याची खात्री वाटत नव्हती, असे सानिया मिर्झाने सांगितले. २०१८ मध्ये मुलास जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी सानियाने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले.
मुंबई : गरोदर असताना २३ किलो वजन वाढले होते, त्यामुळे बाळंतपणानंतर पुन्हा खेळू शकेन याची खात्री वाटत नव्हती, असे सानिया मिर्झाने सांगितले. २०१८ मध्ये मुलास जन्म दिल्यानंतर दोन वर्षांनी सानियाने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. माझे व्यक्तिमत्त्व बाळंतपणानंतर बदलले, असे सानिया म्हणाली. बाळंतपणात माझे वजन २३ किलोंनी वाढले. त्यानंतर वर्कआऊट आणि योग्य आहार घेत ते २६ किलोंनी कमी केले. पुनरागमनानंतर काही महिन्यांत स्पर्धाही जिंकली, असे तिने सांगितले.
अधिक वाचा :