चिडलेल्या विराटला संजय मांजरेकरांचा सल्ला

चिडलेल्या विराटला संजय मांजरेकरांचा सल्ला
Sanjay Manjrekars advice to angry Virat

(Manjrekars advice to angry Virat) टीम इंडियाचे माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून विराटने ‘संयम’ शिकला पाहिजे असा सल्ला दिला आहे. विराटने भारत-इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेआधी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटने मैदानाबाहेर सुरु असलेली चर्चा आपल्यासाठी मूर्खपणापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं.

पत्रकार परिषदेत सध्या फॉर्ममध्य़े नसलेल्या के. एल. राहुल विषयी विराट कोहलीला विचारण्यात आल. यावर त्याने सांगितलं की, मैदानाबाहेर असणारा मूर्खपणा आपण ड्रेसिंग रुममध्ये येऊ देणार नाही.भारतीय खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा दिला जाईल. तसेच त्यांना मानसिक स्वास्थ राखण्यासाठी मदत केली जाईल असही विराटने सांगितलं.

‘’जेव्हा एखादी व्यक्ती कठीण काळातून जात असेल तेव्हा त्याने खेळ विसरला असं होतं नाही. तर त्यावेळी त्याच्याकडे स्पष्टतेचा अभाव आहे असा होतो. त्य़ावेळी तुम्हाला काही गोष्टी बोलल्या जात असतील आणि तुम्ही फॉर्ममध्ये नसल्याचे तुम्हाला सांगितलं जात असेल तर तुम्ही आहे त्यामध्ये अजून भर टाकत आहात,’’ असं सांगत विराटने राहुलला आपला पाठिंबा दर्शवला.

''हा अगदी सोपा खेळ आहे. तुम्हाला चेंडू पाहून प्रतिक्रिया द्यायची असून त्या चेंडूला फक्त टोलवायचं आहे. आणि खरं सांगायचा तर मैदानाबाहेर जी काही चर्चा सुरु असते तो सगळा मूर्खपणा असतो,’’  असं विराटने म्हटलं आहे.      माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून माझ्यासाठी मैदानाबाहेरील चर्चा मूर्खपणाची राहिली आहे, असंही त्याने सांगितलं.

दरम्यान समालोचक संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीने लोक कामगिरी पाहून व्यक्त होतात हे सत्य स्वीकारलं पाहिजे असं म्हटलं आहे. विराटने टिकेला हाताळताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीप्रमाणे संयम आणि परिपक्वता स्वीकारली पाहिजे असा सल्ला दिला आहे.


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com