'तुझ्या मोठ्या भावाकडून ही तुला भेट...: यशस्वी जैस्वालवर खुष झाला संजू सॅमसन

या विजयाने आनंदी होऊन कर्णधार संजू सॅमसनने या सामन्याच्या विजयाचा हिरो यशस्वी जैस्वालला एक भेट दिली आहे.
'तुझ्या मोठ्या भावाकडून ही तुला भेट...: यशस्वी जैस्वालवर खुष झाला संजू सॅमसन
Yashasvi JaiswalDainik Gomantak

पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध धडाकेबाज खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालचे (Yashasvi Jaiswal) क्रिकेट क्षेत्रात तर कौतुक चालूच आहे पण चाहत्यांमध्येही याचा उत्साह दिसून येत आहे. पहिल्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर यशस्वी जैस्वालने संघात पुनरागमन करत पंजाबविरुद्ध शानदार अर्धशतक ठोकले आहे. (Sanju Samson has given a gift to the Yashasvi Jaiswal)

Yashasvi Jaiswal
IPL 2022 |3 संघ प्लेऑफच्या शर्यतीत पुढे; इतर संघांची स्थिती घ्या जाणून

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली, या विजयाच्या आनंदाने, कर्णधार संजू सॅमसनने सामन्याच्या विजयाचा हिरो यशस्वी जैस्वालसाठी एक भेट दिली आहे. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संजू सैमसन (Sanju Samson) त्याचा जोडीदार यशस्वी जैस्वालसोबत गप्पा मारत आहे आणि संजू म्हणाला की काळजी करू नकोस, आज तुझ्या खोलीत तुझा नवीन जोडीदार येईल म्हणजेच मी तुला एक बॅट भेट म्हणून देत आहे. तुझ्या मोठ्या भावाकडून ही तुला भेट.

संजू सॅमसनच्या या घोषणेने ड्रेसिंग रूममध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला, त्यानंतर यशस्वी जैस्वालने कर्णधाराचे आभारही मानले. 20 वर्षीय यशस्वी जैस्वालची गणना देशातील उगवत्या स्टार्समध्ये केली जात आहे. गेल्या आयपीएलमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती आणि त्यावेळ पासून तो सर्वांच्या नजरेत आला. यंदा त्याची सुरुवात चांगली झाली नसली तरी तो पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे असे म्हणायला हरकत नाही.

Yashasvi Jaiswal
दिल्ली कॅपिटल्समध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, बीसीसीआय संभ्रमात

यशस्वीने पंजाब किंग्जविरुद्ध 41 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह 68 धावा केल्या आहेत. या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 189 धावा केल्या, प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना यश मिळालेच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.