संजुलाच्या संयमी फलंदाजीमुळे गोव्याची उत्तरप्रदेशवर मात

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात उत्तर प्रदेशवर तीन विकेट राखून मात करता आली.

पणजी: (Sanjulas restrained batting helped Goa beat Uttar Pradesh) गोव्याचा संघ संकटात असताना संजुला नाईक हिची महत्त्वपूर्ण संयमी फलंदाजी निर्णायक ठरली, त्या जोरावर सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात उत्तर प्रदेशवर तीन विकेट राखून मात करता आली. सामना गुरुवारी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झाला. गोव्यासमोर विजयासाठी 152 धावांचै आव्हान होते. संजुलाने विजयी षटकार ठोकला तेव्हा गोव्याच्या डावातील आठ चेंडू व तीन विकेट बाकी होत्या. गोव्याचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला. मागील लढतीत महाराष्ट्राकडून हार स्वीकारलेल्या गोव्याने आज उत्तर प्रदेशवर डाव उलटविला. नियंत्रित गोलंदाजीसमोर उत्तर प्रदेशला प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या रचता आली नाही. (Sanjulas restrained batting helped Goa beat Uttar Pradesh)

क्रिकेट संघाचा अजब विजय; 4 चेंडूत गाठले लक्ष्य 

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ गोव्याची स्थिती 4 बाद 31 अशी बिकट झाली होती, नंतर तेजस्विनी दुर्गड (32) व कर्णधार शिखा पांडे (35) यांनी संघाला सावरले. संघाच्या 95 धावांवर शिखा धावबाद झाल्याने गोव्याला सहावा झटका बसला आणि उत्तर प्रदेशला विजयाची संधी प्राप्त झाली. मात्र संजुलाने अनुभव पणाला लावत निकिता मळीक हिच्यासह खिंड लढविली. विजयासाठी 27 धावांची गरज असताना निकिता धावबाद झाली. या धक्क्यानंतर दीक्षा गावडे हिने संजुलास समर्थ साथ दिली, त्यामुळे गोव्याचा विजय साकारला. संजुला 33 धावांवर नाबाद राहिली, तिने 84 चेंडूंतील खेळीत दोन चौकार व एक षटकार मारला. 

संक्षिप्त धावफलक

उत्तर प्रदेश ः 50 षटकांत 9 बाद 151 (एकता 12, शोभा देवी 25, मुस्कान मलिक 28, अंजली सिंग 11, निशू चौधरी 18, अदिती 29, शिखा पांडे 10-3-14-1, निकिता मळीक 9-1-35-1, दीक्षा गावडे 10-3-27-1, रूपाली चव्हाण 10-1-32-2, तेजस्विनी दुर्गड 10-0-33-2, पूर्वा भाईडकर 1-0-7-0) पराभूत वि. गोवा ः 48.4 षटकांत 7 बाद 156 (पूर्वजा वेर्लेकर 8, इब्तिसाम शेख 6, विनवी गुरव 4, सुगंधा घाडी 0, तेजस्विनी दुर्गड 32, शिखा पांडे 35, संजुला नाईक नाबाद 33, निकिता मळीक 14, दीक्षा गावडे नाबाद 15, काजल 3-23, राशी कनोजिया 1-20, तनू काला 1-44).

संबंधित बातम्या