सौदीनं आफ्रिदीला केलं ओव्हरटेक, मलिंगाचा विक्रम मोडणार?

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये 99 बळी घेतले आहेत.

न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. बांग्लादेशविरुध्दच्या तिसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये 3 बळी घेतले. यासह साऊदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. या विक्रमासह पाकिस्तानच्या शाहीद आफ्रीदीला मागे टाकले आहे. शाहीद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 98 बळी घेतले आहेत. तर टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये 99 बळी घेतले आहेत. या विक्रमात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा अव्वल स्थानी आहे. मलिंगाने 107  बळी घेतले आहेत. टीम साऊदीला लसिथ मलिंगाचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

तर दुसरीकडे आफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये 95 विकेट घेतल्या आहेत. तर बांग्लादेशच्या शकीब अल हसनने 92 विकेट घेतल्या आहेत. भारतातकडून आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामन्यात यजुवेंद्र चहलच्या नावावर 62 विकेटची नोंद आहे. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो अग्रस्थानी आहे. ब्राव्होने आत्तापर्यंत टी-ट्वेन्टी कारकिर्दीमध्ये 515 विकेट घेतल्या आहेत. सुनील नरेनने 390 विकेट घेतले आहेत. (Saudi overtakes Afridi will break Malingas record)

IPL 2021: CSK  मोठा झटका; आयपीएलमधून तिसऱ्या खेळाडूने घेतली माघार 

न्यूझीलंड-बांग्लादेश यांच्यात झालेल्या तिसऱ्य़ा टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये न्यूझीलंड शानदार खेळी केली. पावसाने व्यत्यय आणलेला सामना न्यूझीलंडने 65 धावांनी खिशात घातला. पावसाच्या व्यत्ययामुळे तिसरा सामना 10-10 षटकात खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत 4 बाद 141 धावा केल्या होत्या. यात फिन एलनने 29  धावा करत जोरदार फटकेबाजी  केली. मार्टीन गुप्तिलने 44 धावा काढल्या. टी-ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 3-0 असा विजय मिळवून मालिका खिशात घातली.
 

संबंधित बातम्या