धोनीला वर्ल्ड कप मिशनसाठी निवडण्याचं कारण...

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून निवड समितीने नियुक्त केले. याबाबत अधिकृत अशी माहीती बीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी दिली आहे.
धोनीला वर्ल्ड कप मिशनसाठी निवडण्याचं कारण...
Mahendra Singh Dhoni & Saurabh GangulyTwitter/ @BCCI

टी-टवेन्टी विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट मंडळाने नुकतेच टीम इंडियाच्या संघांची घोषणा केली आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट मंडळाने अनेक चकित करणारे निर्णय घेतले. त्यामधीलच एक निर्णय म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीला (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून निवड समितीने नियुक्त केले. याबाबत अधिकृत अशी माहीती बीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुली (Saurabh Ganguly) यांनी दिली आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने सांगितले की, आगामी टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला असलेल्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी टीम इंडियाचा मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले आहे. याबाबत गांगुलीने बीसीसीआयच्या एका ट्विटदरम्यान सांगितले होते की, '' धोनीला संघात सहभागी करुन घेण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्याकडे असलेल्या अनुभवाचा फायदा टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला घेता येईल यासाठी. मी महेंद्रसिंग धोनीचे आभार मानतो. त्याने या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची मदत करण्याच्या प्रस्तावाचा स्वीकार केला.''

Mahendra Singh Dhoni & Saurabh Ganguly
Chris Gayle: क्रिकेटच्या 'युनिवर्सल बॉस'ची T-20 मध्ये ऐतिहासिक कामगिरी

तसेच, भारतीय संघाला धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली 2 वेळा वर्ल्डकपमध्ये जेतेपद मिळवून दिले होते. त्याच्याच नेतृत्वाखाली 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत आणि 2011 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती. सध्या महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रिमिअर लीगमध्ये अर्थात (IPL) चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचबरोबर धोनी सध्या इंडियन प्रिमिअर लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी युएईमध्ये आहे. त्याठिकाणी संघाने सराव सत्राला देखील सुरुवात केली आहे.

Mahendra Singh Dhoni & Saurabh Ganguly
T-20 World Cup 2021: साठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा

शिवाय, टीम इंडियाने आगामी टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेसाठी अनेक उमद्या खेळाडूंना संघाच संधी दिली आहे. त्याचबरोबर असेही काही खेळाडू आहेत, ज्यांची निवड होणे आपेक्षित होते. मात्र त्यांना निवड समितीने संघातून वगळले. ज्यामध्ये प्रामुख्याने यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal), आणि टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे सुमारे चार वर्षानंतर फिरकीपटू आर. अश्विनला संघात स्थान दिले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com