आपीएलच्या उर्वरीत हंगामासाठी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला कात्री ?

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर याकालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामने खेळविण्यात येणार आहेत. परंतु या मालिकेतील सामने कमी करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) यंदाचा हंगाम पूर्णकरण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) उत्सुक आहे. आयपीएल दुसऱ्या टप्प्यासाठी भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) यांच्यातील कसोटी मालिकेला कात्री लावण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. याबाबत बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यात चर्चा सुरु आहे.(Scissors in the England Test series against India for the rest of the APL season?) 

एफसी गोवाची महिला फुटबाॅलपटू स्टेसी कार्दोझच्या कारकिर्दीस नवी दिशी

आयपीएल यंदाचा हंगाम सुरु असताना भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे  बीसीसीआयला आयपीएलचे राहिलेले 31 सामने स्थगित करावे लागले. हे सामने आता सप्टेंबरमध्ये खेळविण्यात येणार आहेत. त्या आधी 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर याकालावधीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामने खेळविण्यात येणार आहेत. परंतु या मालिकेतील सामने कमी करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.  याबाबत त्यांची इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा सुरु आहे. आयपीएलची प्रक्षेपण वाहिनी स्टार स्पोर्टस् (Star Sports) ने देखील याला सहमती दर्शवली आहे. आयपीएल सामन्यांमधून इंग्लंड क्रिकेट बोर्डाला फायदा होऊ शकतो, यामुळे त्यांच्याकडून देखील याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या