घाडी फिटनेसचा सागर इंग्लंड मधील स्पर्धेत अंतिम फेरीत

सागरला गोव्या (Goa) बद्ल व आपल्या फिटनेसची सुरुवात करणा-या ‘घाडी फिटनेस’ (Ghadi Fitness) व्यायाम शाळेबद्दल फारच आस्था आणि अभिमान आहे. गोव्यात सागरचा एक मोठा चाहता वर्ग आहे.
घाडी फिटनेसचा सागर इंग्लंड मधील स्पर्धेत अंतिम फेरीत
सागर बि.के.ची इंग्लंडमध्ये (England) होणाऱ्या अर्नोल्ड क्लासिक फिजिकच्या (Arnold Classic Physics) अंतीम फेरीमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाली आहे. Dainik Gomantak

साळगाव येथील ‘घाडी फिटनेस’ (Ghadi Fitness) या व्यायामशाळेत फिटनेस ट्रेनिंग (Fitness training) घेणा-या सागर बि.के.ची इंग्लंडमध्ये (England) होणाऱ्या अर्नोल्ड क्लासिक फिजिकच्या (Arnold Classic Physics) अंतीम फेरीमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाली आहे. क्वालिफायर मध्ये त्याची सेकंड रनरअप म्हणून निवड झाली. त्याने ५.९ ते ५.११ इंच श्रेणीमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.

सागर बि.के.ची इंग्लंडमध्ये (England) होणाऱ्या अर्नोल्ड क्लासिक फिजिकच्या (Arnold Classic Physics) अंतीम फेरीमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाली आहे.
IPL 2021 Scheduled: वाचा कोणता सामना कधी

अर्नोल्ड क्लासिक ही जागतिक मान्यता लाभलेली खुली वर्ग स्पर्धा आहे. जेतेपदासाठी आता युरोपातील सुमारे १०० स्पर्धकात हा मुकाबला होणार आहे. साळगाव येथील घाडी फिटनेस व्यायामशाळेत शरीर सौष्टवाचा श्रीगणेशा करणाऱ्या सागरची ही दूरवरची मजल आहे.

सागर बि.के.ची इंग्लंडमध्ये (England) होणाऱ्या अर्नोल्ड क्लासिक फिजिकच्या (Arnold Classic Physics) अंतीम फेरीमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाली आहे.
Goa Football: स्पोर्टिंग क्लब फुटसालमध्ये विजेता

आज सागर जिथे पोहोचलात तिथे पोहोचणे सोपे नव्हते. वयाच्या पंधराव्या वर्षी २००५ मध्ये नेपाळहून तो भारतात आला. ४ वर्षे इतरत्र संघर्ष केल्यानंतर २००९ मध्ये तो गोव्यात आला. डिजे, बाउंसर, पुढे फास्ट फूडचा गाडा असा संघर्ष करीत पुढे जात राहिला. २०१५ आणी २०१६ मध्ये त्याने घाडी फिटनेस श्री किताब मिळवला. गोव्यात सतत दोन वर्षे अखिल गोवा स्पर्धेत पारितोषिके मिळवत राहिला. पुढे आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने नेपाळचे प्रतिनिधित्व केले व त्यात त्याला दुसरा क्रमांक मिळाला.

मिस्टर ओलंपिया हौशी २०१७ या स्पर्धेत तो पहिल्या १२ मध्ये पोहोचला होता. २०१८ त तो लग्न होऊन इंग्लंडात स्थाईक झाला. तिथे २0१८ मध्ये झालेल्या मेन फिजिक्समध्ये तो सेकंड रनर-अप ठरला. ऑगस्ट २०१९ ची ब्रिटिश केंट क्लासिक गोल्ड जिंकल्या नंतर ब्रिटीश फायनलमध्ये सागरने टॉप ७ मध्ये प्रवेश केला होता. सागरला गोव्या बद्ल व आपल्या फिटनेसची सुरुवात करणा-या ‘घाडी फिटनेस’ व्यायाम शाळेबद्दल फारच आस्था आणि अभिमान आहे. गोव्यात सागरचा एक मोठा चाहता वर्ग आहे. सगळ्यांचे डोळे आता अर्नोल्ड क्लासिकच्या पुढील फेरी कडे लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com